पोस्ट्स

वरोरा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

*शासन स्तरावर शाळा महाविद्यालयातून शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात यावा.*

इमेज
   महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ.शिवाजी महाराज यांची जयंती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर १९ फेब्रुवारी रोजी जगभर साजरी होत असते. छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहचण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा महाविद्यालयांमधून शिवजयंती निमित्ये विविध कार्यक्रम जसे - शिवचरित्रावर स्पर्धा परिक्षा,वकृत्व स्पर्धा,वेषभुषा स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,सांस्कृतिक स्पर्धा,गडकिल्ले नमुने निर्माण स्पर्धा... इ.विविध उपक्रमांचे आयोजन प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये करुन दरवर्षी १९ फेब्रुवारी शिवजयंती दिनी मुख्य शिवजयंतीचा कार्यक्रम घेवून त्या कार्यक्रामात प्रोत्साहन पर बक्षिस वितरन करण्यास महाराष्ट्र शासनाचे शिक्षण मंत्रालयाकडून परिपत्रक काढून १९ फेब्रुवारी २०२३ पासून शासकीय स्तरावर प्रत्येक शाळा महाविद्यालयांमधून शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात यावा यासाठी शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षकपरिषदेने महाराष्ट्राचे मा.राज्यपाल, मा.मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली असल्याची माहिती शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्राचे राज्यउपाध्यक...

शोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज"*

इमेज
     - रामचंद्र सालेकर  (वाघनख शाळेत संत तुकाराम महाराज जयंती संपन्न)    जि.प.चंद्रपूर पं.स.वरोरा अंतर्गत जि.प.उ.प्राथ.शाळा वाघनख येथे २ फेब्रुवारी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची जयंतीचा कार्यक्रम मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. आपल्या अध्यक्षीय भाषणात सालेकर यांनी संत तुकाराम महाराज यांनी प्रस्थापित शोषकांना आपल्या अभंगरुपी शस्त्राने परास्त करुन त्यांचा कर्मकांड अंधश्रद्धा वर्णभेद जातीभेदाचा डोलारा किर्तनाच्या माध्यमातून ध्वस्त करुन शोषितांना जागवलं याचा बदला त्यांनी इंद्रायनीत अभंगगाथा बुडवून त्यांना संपविले.ज्या गोष्टींवर जगतगुरु तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून घनाघाती वार केले,प्रस्थापित शोषकांच्या विरोधात विद्रोह केला. परंतु दुर्दैव असे की तुकाराम महाराजांनी ज्या गोष्टीचा आयुष्यभर विरोध केला, त्याच काल्पनीक मिथ्या कथा रचून तुकाराम महाराजांचा खुन लपविण्यात आला व पुष्पक विमानाने वैकुंठाला गेल्याची भ्रामक आवई ठोकून या शोषकांनी स्वतःचे पाप लपविले. तुकोबाचा वारकरी म्हणजे अनिष्ठ रुढी परंपरा कर्मकांड अंधश्रद्धा...इत्यादींवर वार करणारा असा होता परंतु...

एकोना गावाचे पुनर्वसन करा -सरपंच गणेश चवले

इमेज
कोळसा खाणी मुळे गावकरी त्रस्त. वरोरा -तालुक्यातील एकोना,चरुरखटी,मार्डा,वनोजा या गावाची जमीन वेकोली ने अधिग्रहित करण्यात आली.व खुली कोळसा खाण सुरू झाली.खदाणीत होत असलेले स्फोट,व कोळसा वाहतुकीमुळे होत असलेले प्रदुषण यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून गावाचे पुनर्वसन न केल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा एकोना चे सरपंच गणेश चवले यांनी दिला आहे.एकोना गावातील शेतकरी यांच्या उर्वरित जमिनी अधिग्रहित करून तात्काळ गावाचे पुनर्वसन करावे, गावांसाठी रुग्णवाहिका व अग्निशमन दलाचे व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. माढेळी रोडवरील देवरा नाला ते एकोना पर्यंत वेकोलीने सिमेंट रस्ता तयार करुन त्याची उंची वाढविण्याची गरज असुन कोळसा वाहतुकीमुळे गावकरी यांचा अपघात झाल्यास त्याच्या भरपाईची रक्कम निश्चित करावी.प्रदुषन होऊ नये यासाठी कोळसा वाहतुक करतांना ताडपत्री चा वापर करावा,एकोना गावातील बेरोजगारी कमी करून तात्काळ रोजगार द्यावा. सिएसआर फंडातून गावातील विकासकामे करावी.खदानित स्फोट होत असल्याने गावातील घरांना भेगा पडल्या आहेत.त्यामुळे नुकसान भरपाई द्यावी.एकोना थांब्यावर बस थांबविण्यासाठी तसेच प...