पोस्ट्स

नाशिक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नाशिकच्या जवानाला वीरमरण: नाशिक जिल्ह्यावर अशोक कळा, श्रीनगर मध्ये वीरगती

इमेज
नाशिकच्या जवानाला वीरमरण: नाशिक जिल्ह्यावर शोक कळा, श्रीनगर मध्ये वीरगती नाशिक: जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील जवानास वीरगती प्राप्त झाली आहे. चांदवड तालुक्यातील हरनुल येथील भारतीय सैन्य दलातील विकी अरुण चव्हाण वय 25 वर्ष ते श्रीनगरला कार्यरत होते. कुस्तीचा सराव सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विकी चव्हाण या जवानाच्या निधनाने चव्हाण कुटुंबासह संपूर्ण गावावर शोक कळा पसरली आहे.

प्रवाशांनी भरलेली बस 400 फुट खोल दरीत कोसळली

इमेज
नाशिक : नाशिकमध्ये भीषण बस अपघात झाल्याचं समोर आलं आहे. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. यावेळी एकाचा मृत्यू झाला, तर बसमधून प्रवास करणारे २२ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले आहे, तर काही प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात झाला. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात गणपती टप्प्यावरुन बस दरीत कोसळल्याची माहिती आहे. आज पहाटे साडेसहा -पावणेसात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सप्तश्रृंगी गडावरुन बुलढाण्यातील खामगाव येथे जात असताना बस दरीत कोसळली. खामगाव डेपोची एसटी बस अपघातग्रस्त झाली. यावेळी बसमध्ये २२ जण प्रवास करत होते. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. बस क्रमांक MH 40 AQ 6259 वर ड्रायव्हर गजानन टपके, कंडक्टर पुरुषोत्तम टिकार कर्तव्यावर होते. अपघातात ड्रायव्हर गंभीर जखमी झालाय, असे खामगाव आगार सहाय्यक कर्मचारी शुभांगी पवार यांनी सांगितले. बस रात्री सप्तश्रृंगी गडावर मुक्कामी होती. पहाटेच्या सुमारास बस गडावरुन खाली यायला निघाली. दाट धुक्य...

*लाचखोर महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात*

इमेज
नाशिक : नाशिकमध्ये एका महिला अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडल्याची घडना समोर आलेली. संबंधित प्रकरण राज्यभरात गाजलं होतं. पण तरीही काही अधिकारी या घटनांमधून काहीच बोध घेताना दिसत नाहीय. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांकडून अजूनही लाच मागण्याचे प्रकार समोर येत आहेत. नाशिकमध्ये पुन्हा तसाच प्रकार समोर आला आहे. एका महिला शिक्षण अधिकाऱ्याने एका सस्पेंड मुख्याध्यापकाकडे पत्र पाठवण्यासाठी तब्बल 50 हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे संबंधित शिक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकली आहे. एसीबीने सापळा रचत या महिला अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीने मोठी कारवाई केली आहे. एसीबीने नाशिक महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर आणि एका शासकीय कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. एसीबीने दोघांना अटक केली आहे. एसीबीच्या पथकाकडून तब्बल 50 हजार रुपयांची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी सुनीता धनगर यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय? विशेष म्हणजे महापालिकेत लाचलुचपत विभागाकडून करण्यात आलेल्या कारवा...

शिवशाही बस मध्ये चालकाची आत्महत्या

इमेज
 नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर - शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पांगरी शिवारात नादुरुस्त शिवशाही बसमध्ये चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कमरेला बांधण्याच्या करदोऱ्याच्या साहाय्याने या चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे. राजू हिरामण ठुबे (वय ४९, रा. दोनवाडे (भगूर), ता. नाशिक) असं आत्महत्या केलेल्या चालकाचं नाव आहे. चालक राजू ठुबे हे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगार क्रमांक एक मध्ये कार्यरत होते. शिर्डी येथून नाशिककडे शिवशाही बस क्रमांक एमएच ०९ ईएम १२८० घेऊन ते जात असताना दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यात वावी सोडल्यानंतर पांगरी शिवारात बस नादुरुस्त झाली. या बसमधील प्रवाशांना पाठीमागून येणाऱ्या बसमध्ये बसवून दिल्यानंतर ठुबे यांनी सिन्नर आगारात निरोप देऊन दुरुस्ती पथक पाठवण्याची विनंती केली होती. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत सिन्नर येथील दुरुस्ती पथक न आल्यामुळे त्यांच्यासोबत असलेली महिला चालक देखील निघून गेली. रस्त्यात बिघडलेल्या बससोबत चालक ठुबे एकटेच होते. रात्री सव्वा ते दीड वाजेच्या सुम...