Ticker

6/recent/ticker-posts

प्रवाशांनी भरलेली बस 400 फुट खोल दरीत कोसळली



नाशिक : नाशिकमध्ये भीषण बस अपघात झाल्याचं समोर आलं आहे. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. यावेळी एकाचा मृत्यू झाला, तर बसमधून प्रवास करणारे २२ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले आहे, तर काही प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात झाला. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात गणपती टप्प्यावरुन बस दरीत कोसळल्याची माहिती आहे. आज पहाटे साडेसहा -पावणेसात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सप्तश्रृंगी गडावरुन बुलढाण्यातील खामगाव येथे जात असताना बस दरीत कोसळली. खामगाव डेपोची एसटी बस अपघातग्रस्त झाली. यावेळी बसमध्ये २२ जण प्रवास करत होते. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

बस क्रमांक MH 40 AQ 6259 वर ड्रायव्हर गजानन टपके, कंडक्टर पुरुषोत्तम टिकार कर्तव्यावर होते. अपघातात ड्रायव्हर गंभीर जखमी झालाय, असे खामगाव आगार सहाय्यक कर्मचारी शुभांगी पवार यांनी सांगितले.

बस रात्री सप्तश्रृंगी गडावर मुक्कामी होती. पहाटेच्या सुमारास बस गडावरुन खाली यायला निघाली. दाट धुक्याचा परिसर, सातत्याने पडणारा पाऊस आणि घाटात असलेल्या अवघड वळणांवर चालकाचा ताबा सुटून बसचा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, बचावपथक, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून जखमी प्रवाशांना वणी उपरुग्णालयात नेले जात आहे. "

Post a Comment

0 Comments