पोस्ट्स

पोंभुर्णा तालुका लेबलसह पोस्ट दाखवत आहे

*शिवसेनेतर्फे महिला मेळावा, हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न*

इमेज
पोंभूर्णा : गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक असा नारा देत शिवसेनेच्या वतीने पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीकोणातून पोंभूर्णा शहरात राजराजेश्वर सभागृह येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) गटातर्फे महिला मेळावा,व हळदी कुंकू कार्यक्रम,शहर महिला आघाडी तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन मनस्वीताई संदीप गिऱ्हे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख तथा आष्टाचे सरपंच किरणताई किशोर डाखरे, प्रमुख उपस्थिती वर्षाताई विलास मोगरकार, नगरसेविका न.पं.रामेश्वरीताई गणेश वासलवार,शहर महिला संघटीका कांताबाई मेश्राम,ललिता कोवे,भाविका मडावी,रोशनी देवताळे,रेखा निमगडे,रजनी कोटरंगे,मेघा मानकर,सोनी मानकर,अर्जना कोसरे,व आदी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर महिला मेळावा,व हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात उत्तम प्रतिसादाने संपन्न झाला. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी शिवसेना पक्ष अधिक मजबूत, बळकट करण्याच्या सूचना दिल्या व महिला पदाधिकारी कार्यकर्ते चांगले व योग्य रीतीने काम करीत असल्याचे सांगत महिला...

शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जुनगाव च्या अध्यक्षपदी बंडुजी येलमुले यांची अध्यक्षपदी निवड

इमेज
पोंभुर्णा: परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना ही गावागावात व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवत आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक तरुण व्यसनमुक्त होत आहेत ही आनंदाची बाब आहे.       तालुक्यातील जुनगाव येथे सुद्धा ही संघटना कार्यरत असून या संघटनेच्या शाखा अध्यक्षपदी बंडुजी पाटील येलमुले यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडी चे त्यांच्या चाहत्यांकडून स्वागत आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

भाजपा कार्यालय पोंभुर्णा येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी- शोषित पीडित महिलेला दिला आधार

इमेज
पोंभुर्णा: शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे साजरी करण्यात आली.        याप्रसंगी गरीब व शोषित पीडित महिला मेघा पिंपळशेंडे यांना भाजपा महिला आघाडीने दैनंदिन गरजा पूर्ण करू शकत नसल्यामुळे त्यांना किराणा किट आणि साडी जोडी व मुलींसाठी कपडे देऊन सावित्रीच्या लेकीने एका साक्षात सावित्रीला सहकार्य करून खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि वारसा या कार्यक्रमात दिसून आला.       याप्रसंगी भाजपाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अलका आत्राम, नगराध्यक्ष सुलभाताई पिपरे, उपनगराध्यक्ष अजित भाऊ मंगळगिरीवार, महामंत्री हरीश ढवस, मोहन चलाख, नगरसेविका नंदा कोटरंगे, नगरसेविका श्वेता वनकर, जिल्हा सचिव रजिया कुरेशी, शहराध्यक्ष वैशाली बोलमवार, सुनिता मॅकलवार, मीना मूलकलवार, संगीता जिलकुंटावार, अविनाश डोंगरे, विकास दिवसे, राजू ठाकरे, अरविंद दातारकर इत्यादी उपस्थित होते.

पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू मात्र नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने अडथळा

इमेज
जिवनदास गेडाम पोंभर्णा: चंद्रपूर जिल्ह्याचे अगदी शेवटचे टोक असलेल्या व पोंभुर्णा तालुक्याच्या सीमेवर आणि वैनगंगा नदीच्या विळख्यात वसलेल्या जुनगाव येथे अनेक वर्षाच्या मागणीला पूर्णत्व येऊन 11 करोड रुपयाचे पुलाचे बांधकाम मंजूर झाले. या पुलाच्या बांधकामास युद्ध पातळीवर सुरुवात करण्यात आली असून लेवल स्तरावरील पिल्लर चे काम सुरू आहे. लेवल वर बांधकाम येताच वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बांधकामात अडथळा निर्माण झाला असून नदीत तयार करण्यात आलेला रस्ता वाहून गेला आहे.         चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बेरेजचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. डिसेंबर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच नदी नाले कोरडे पडले असल्याचे जाणवू लागले. त्यामुळे चीच डोह प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने नदीला पाणी सोडले आहे. याचा फटका जूनगाव येथील वैनगंगा नदीच्या उपप्रवाह वरील तयार करण्यात येत असलेल्या पुलाच्या बांधकामास बसला आहे.      जुनगाव या गावची समस्या पूल असताना सुद्धा पावसाळ्यात बिकट होत असते,त्यामुळे नदीवरील तयार असलेल्या आधीच असलेल्या बुडीत पुलामुळे अनेक दिवस पुराचा सामना करावा लागत असत...

यू. पी. योद्धा उमरी पोतदार यांच्या विद्यमाने कबड्डी खेळाचे आयोजन

इमेज
पोंभुर्णा (उमरी पोतदार) : यु. पी. योद्धा उमरी पोतदार यांच्या विद्यमाने कबड्डी खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कब्बडी हा खेळ उमरी पोतदार येथे घेत आहेत. या खेळाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील कब्बडी खेळाडू आपली कला, खुषलता दाखवीत यामध्ये हिरीहिरीणे सहभाग नोंदवून कब्बडी खेळण्याचा आनंद घेत असतात. यावर्षी सुद्धा सर्व खेळाडू आनंदाची बातमी आहे. यू. पी. योद्धा उमरी पोतदार येथे दिनांक ०६, ०७, ०८ जानेवारी २०२३ रोजी अनिल पाटील यांच्या भव्य पटांगणावर कबड्डी खेळाचे आयोजित केलेला आहे.  यावेळी यू. पी. योद्धा टीमच्या सदस्यांनी सर्व खेळाडूंना आग्रहाची विनंती करीत आहे की, मोठ्या संख्येने कब्बडी खेळाचा आनंद घ्यावा आणि पारितोषिक पटकावून आपला नाव रोशन करावे असे खेळाडूंना विनंती करीत आहे. कब्बडी खेळाचे उद्घाटन मा. श्री. बाळूभाऊ धानोरकर खासदार, चंद्रपूर - वनी - आर्णी लोकसभा क्षेत्र, सह उद्घाटक मा. श्री. विनोद भाऊ अहिरकर माजी उपाध्यक्ष जि.प. चंद्रपूर, अध्यक्ष मा. श्री. विलासभाऊ मोगरकर सरपंच ग्रा. पं. देवाडा खुर्द, मा. सौ. थामेश्वरी लेनगुरे ग्रा. पं. उमरी पोतदार, मा. श्री. पठाण ...

युवानेते आशिष कावटवार यांच्या वाढदिवसा निमित्त 51 जणांनी केले रक्तदान- विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा

इमेज
पोंभूर्णा: प्रतिनिधी   शिवसेना तालुका प्रमुख तथा नगरपंचयातचे विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरामध्ये 51 जणांनी रक्तदान देऊन वाढदिवस साजरा केला, त्यानंतर ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप व शालेय विद्यार्थांना नोट बुक व पेन्सिल वाटप करण्यात आले.  या कार्यक्रमास ग्रामीण रुग्णालयचे डॉक्टर अनिकेत गेडाम,शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे,सरपंच विलास मोगरकार, नगरसेवक अभिषेक बद्दलवार,सूरज माडूरवार,जयपाल गेडाम,महेद्र शेडमाके,शेषभुषण कुडसंगे,अनिल पेंदोर,प्रीतम उराडे,भोलानाथ कोवे,अवी वाकडे,रविंद्र ठेंगणे,उपसरपंच वेदनाथ तोरे,शंकर वाकूडकर,पवन गेडाम,कालीदास उइके,प्रफुल दिवसे,  आदि मान्यवर उपस्थीत होते.आयोजन युवासेनेचे शहर प्रमुख महेश श्रिगिरीवार,राकेश मोगरकर,आशिष कावडे,नितीन येरोजवार,पराग मोरे,साहिल पोरटे,स्वप्निल चौधरी,साहिल धोडरे,गैरव पेंदोर,संदीप ठाकरे,ताराचंद गुरूनुले,अमोल कावटवार,महेश धोडरे,संदीप सुमटकर,शुभम वासेकर आदी मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

आनंदाचा शिधा पोंभुर्णा तालुक्यात पोहोचलाच नाही!

इमेज
  पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी        राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने दिवाळीनिमित्त सर्वसामान्य नागरिकांना शंभर रुपयात चार वस्तूंचा "आनंद शिधा" देण्याची योजना जाहीर केली, मात्र ही योजना पूर्ती फसवी ठरली असून सर्व सामान्यांना हा "आनंद शिधा" अजूनही मिळाला नाही. त्यामुळे सामान्यांची दिवाळी गोड होण्याऐवजी कडूच झालेली आहे.       सर्व सामान्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने शंभर रुपयात एक किलो रवा' मैदा' चणाडाळ आणि एक किलो तेल देण्याची योजना शिंदे फडणवीस सरकारने जाहीर केली. मात्र दिवाळी संपूनही गेली तरीही हा "आनंद शिधा" तालुक्यात अनेक गावात पोहोचला नसल्याची ओरड होत आहे. याबाबतीत तहसील कार्यालयात जाऊन विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजी कसलीही शासकीय सुट्टी नसताना तहसील कचेरी कर्मचाऱ्यांना होती. पुरवठा विभागाला तर चक्क कुलूपच लागले होते.        आनंदाचा शिधा योजनेतील किटमध्ये दिवाळीत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब अर्थात केशरी शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयांमध्ये दिवाळीचा शिधा मिळणार होता. परंतु तो अद्यापही मिळाला नाही. ...