जिवनदास गेडाम
पोंभर्णा: चंद्रपूर जिल्ह्याचे अगदी शेवटचे टोक असलेल्या व पोंभुर्णा तालुक्याच्या सीमेवर आणि वैनगंगा नदीच्या विळख्यात वसलेल्या जुनगाव येथे अनेक वर्षाच्या मागणीला पूर्णत्व येऊन 11 करोड रुपयाचे पुलाचे बांधकाम मंजूर झाले. या पुलाच्या बांधकामास युद्ध पातळीवर सुरुवात करण्यात आली असून लेवल स्तरावरील पिल्लर चे काम सुरू आहे. लेवल वर बांधकाम येताच वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बांधकामात अडथळा निर्माण झाला असून नदीत तयार करण्यात आलेला रस्ता वाहून गेला आहे.
चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बेरेजचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. डिसेंबर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच नदी नाले कोरडे पडले असल्याचे जाणवू लागले. त्यामुळे चीच डोह प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने नदीला पाणी सोडले आहे. याचा फटका जूनगाव येथील वैनगंगा नदीच्या उपप्रवाह वरील तयार करण्यात येत असलेल्या पुलाच्या बांधकामास बसला आहे.
जुनगाव या गावची समस्या पूल असताना सुद्धा पावसाळ्यात बिकट होत असते,त्यामुळे नदीवरील तयार असलेल्या आधीच असलेल्या बुडीत पुलामुळे अनेक दिवस पुराचा सामना करावा लागत असतो.
ही सततची कटकट लक्षात घेऊन जूनगावचे विद्यमान उपसरपंच श्री राहुल भाऊ यांनी सतत पाठपुरावा करून वैनगंगा नदीच्या उपप्रवाह वर मोठ्या पुलाच्या निर्मितीस मंजुरी मिळवून आणली. या विभागाचे आमदार आणि विद्यमान वने व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी राहुल भाऊ पाल यांच्या सततच्या मागणीची दखल घेऊन येथे अकरा कोटी रुपयाचे मोठ्या पुलास मंजुरी मिळवून दिली.
मंजुरी मिळताच लगेच पुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मंत्री महोदयांच्या हस्ते पार पडला. गावातील पाच प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यामध्ये माजी सरपंच जीवनदास गेडाम, प्रतिष्ठित नागरिक पांडुरंग पाटील पाल, जगन्नाथ पाटील चिंचोलकर, नामदेवजी झबाडे, यांच्या हस्ते मंत्री महोदयांनी टिकास मारवून भूमिपूजन करून घेतले. त्यानंतर या पाचही लोकांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कारण यांचेही योगदान या पुलाच्या मंजुरीसाठी आहेत. यांच्या आणि उपसरपंच राहुल भाऊ यांच्या समन्वयातून हे स्वप्न साकार झाले आहे.
राहुल भाऊ पाल हे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर वैनगंगा नदीच्या मोठ्या प्रवाहावर मोठ्या पुलाच्या निर्मितीसाठी अनेक हाल अपेष्टा सहन करून शेकडो ग्रामपंचायतीचे ठराव, एकत्र करून मागणी केली. या मागणीला सुद्धा त्यांच्या यश आले असून मोठ्या नदीवरील पुलासाठी सुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल घेऊन 70 कोटी रुपयांच्या पुलास मंजुरी दिली आहे. या पुलासही लवकरच सुरुवात होईल आणि चंद्रपूर ते गडचिरोली असा थेट संपर्क करता येईल.
एकाच वेळेस 81 करोड रुपयाचे बांधकाम जुनगाव येथील दोन्ही नदीवर झाले असून यामध्ये सर्वात मेहनत घेतली असेल ते या गावचे उपसरपंच राहुल भाऊपाल यांना या कामाचे योगदान जाते. त्यांनी न थकता सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याशी सतत संपर्कात राहून व सतत समस्या रेटून समस्या मार्गी काढल्याबद्दल गावकऱ्यांनी राहुल भाऊ पाल यांचे आभार मानले आहेत.
0 Comments