पोस्ट्स

mul लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गावातील वैध अवैध दारू बंद करा। आणि एक लाख रुपये जिंका! महिला बचत गटांसाठी गंगाभाई इद्दूलवार यांचा अनोखा उपक्रम

इमेज
गावातील वैध अवैध दारू बंद करा। आणि एक लाख रुपये जिंका! महिला बचत गटांसाठी गंगाभाई इद्दूलवार यांचा अनोखा उपक्रम चंद्रपूर : प्रतिनिधी   जीवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी  चंद्रपूर:गावातील दारूबंद होऊन गाव सुदृढ व्हावे यासाठी अनेक सामाजिक संघटना आपापल्या क्षेत्रात व आपापल्या परिसरात कार्य करीत असतात, जनजागृती करून अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी व दारूच्या आहारी जाणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. तर काही ठिकाणी या सर्व गोष्टींना झुगारून वैध अवैध दारू विकली जात आहे.  मुल तालुक्यातील जुनासुरला या गावात सरकार मान्य देशी दारूचे दुकान आहे. या दुकानातून वाजवीपेक्षा जास्त किंमत घेऊन देशी दारू विकली जाते. त्यामुळे दारूच्या आहारी गेलेल्या लोकांना आर्थिक भुर्दंड सहन करून आपली शोक भागवावी लागते. येथे सरकारी दारूच्या दुकानातून 35 रुपये किमतीचा देशी दारूचा टिल्लू हा सरळ सरळ 40 रुपये मध्ये विकल्या जात आहे. असा आरोप येथील तरुणांनी व नागरिकांनी केला आहे. यापूर्वी माध्यमातून बातमी प्रसारित झाल्याने 40 रुपयावरून 35 रुपये टिल्लू करण्यात आला होता. परंतु काही दिवसांनी पुन्हा चाळीस रुपये करण्यात आल्याने...

ग्रामीण स्तरावर खेळले जाणारे क्रिकेट आपल्या खेळाडूंना मोठा आकार देऊ शकते

इमेज
काँग्रेस नेते व सी डी सी सी बँकेचे जिल्हाध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे प्रतिपादन विजय जाधव, नांदगाव ग्रामीण भागात खेळले जाणारे क्रिकेट ग्रामीण भागातील सर्वसामान्य खेळाडूंची प्रतिभा उंचावण्याचे कार्य करते, कला, क्रीडा,व साहित्य आणि संस्कृती जोपासण्याकरिता ग्रामीण भागाचा मोलाचा वाटा आहे. असे प्रतिपादन काँग्रेस नेते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंहरावत यांनी केले. ते नांदगाव येथे रात्र कालीन भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. थ्री स्टार क्रिकेट मंडळ नांदगाव च्या वतीने सदर सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ भाऊ वाकुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून हे क्रीडा सत्र रात्र कालीन सुरू झाले आहे. याप्रसंगी संतोषसिंहरावत यांनी या सामन्यांच्या आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य आणि मदत करण्याचे आश्वासन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काँग्रेस नेते संतोष सिंह रावत यांनी मंचावरून आपले विचार व्यक्त करताना केले. या सामन्यांचे उद्घाटन राजुरा विधानस...

थ्री स्टार क्रिकेट क्लब नांदगाव च्या वतीने भव्य अंडर आर्म टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन

इमेज
  नांदगाव प्रतिनिधी  मुल तालुक्यातील नांदगाव कला क्रीडा साहित्य संस्कृती जोपासण्याकरिता दुसऱ्यांदा रात्र कालीन भव्य स्टार क्रिकेट क्लब च्या वतीने सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे नांदगाव येथील शितलताई राठोड आदिवासी आश्रम शाळेत दिनांक 27 10 2022 पासून नांदगाव टेनिस प्रीमियर लीगला सुरुवात होत आहे सदर क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष भाऊ धोटे यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष भाऊ रावत हे राहणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस कुमारी शिवानी ताई वडेटिवार तसेच ‌ नांदगावच्या सरपंच कुमारी हिमानी ताई वाकुडकर ह्या प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सदर क्रिकेट सामन्यांचा दर्शकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन अभिजीत दशरथ वाकुडकर यांनी केले आहे.