Ticker

6/recent/ticker-posts

गावातील वैध अवैध दारू बंद करा। आणि एक लाख रुपये जिंका! महिला बचत गटांसाठी गंगाभाई इद्दूलवार यांचा अनोखा उपक्रम

गावातील वैध अवैध दारू बंद करा। आणि एक लाख रुपये जिंका!


महिला बचत गटांसाठी गंगाभाई इद्दूलवार यांचा अनोखा उपक्रम


चंद्रपूर : प्रतिनिधी
 
जीवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी 

चंद्रपूर:गावातील दारूबंद होऊन गाव सुदृढ व्हावे यासाठी अनेक सामाजिक संघटना आपापल्या क्षेत्रात व आपापल्या परिसरात कार्य करीत असतात, जनजागृती करून अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी व दारूच्या आहारी जाणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. तर काही ठिकाणी या सर्व गोष्टींना झुगारून वैध अवैध दारू विकली जात आहे. 
मुल तालुक्यातील जुनासुरला या गावात सरकार मान्य देशी दारूचे दुकान आहे. या दुकानातून वाजवीपेक्षा जास्त किंमत घेऊन देशी दारू विकली जाते. त्यामुळे दारूच्या आहारी गेलेल्या लोकांना आर्थिक भुर्दंड सहन करून आपली शोक भागवावी लागते. येथे सरकारी दारूच्या दुकानातून 35 रुपये किमतीचा देशी दारूचा टिल्लू हा सरळ सरळ 40 रुपये मध्ये विकल्या जात आहे. असा आरोप येथील तरुणांनी व नागरिकांनी केला आहे. यापूर्वी माध्यमातून बातमी प्रसारित झाल्याने 40 रुपयावरून 35 रुपये टिल्लू करण्यात आला होता. परंतु काही दिवसांनी पुन्हा चाळीस रुपये करण्यात आल्याने तळीरामांचा राग अनावर झाला आहे.

याच गावात परवानाधारक देशाचे दारू दुकान असतानाही अनेक ठिकाणी अवैध दारू गावात विकली जाते. त्यामुळे गावातील शांतता, सुव्यवस्था आणि औदार्यता भंग पावत आहे. हे निदर्शनास आल्यामुळे गावातील काही तरुणांनी गावातील अवैधवैध दारूबंदी करण्यासाठी सरसावल्याने अवैध दारूचा धंदा करणाऱ्या धंदेवाईकांचे धाबे दणाणले आहेत.


विशेष म्हणजे येथील तरुण गंगा भाई इब्दुलवार यांनी पुढाकार घेऊन गावातील वैध आणि अवैध दारू विक्री बंद केल्यास आपण महिला बचत गटांना एक लाख रुपयाचे बक्षीस देऊ असे जाहीर केले आहे. त्यांच्या या आव्हानाचे काय पडसाद उमटतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

Post a Comment

0 Comments