माझ्या साहेबांना पैशाने ओवाळता काय? तुमच्यासारखे ५० मुख्यमंत्री त्यांच्यावरून आम्ही ओवाळून टाकू !

माझ्या साहेबांना पैशाने ओवाळता काय? तुमच्यासारखे ५० मुख्यमंत्री त्यांच्यावरून आम्ही ओवाळून टाकू ! ठाणे, दरारा 24 तास न्युज नेटवर्क (प्रतिनिधी) - धर्मवीर आनंद दिघे यांची पत्रे लिहिणाऱ्या महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण नंदकुमार गोरुले यांनी मिंधेंना फोडून काढले आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमाकडे केवळ देश एक आदर्श वस्तुपाठ म्हणून पाहात होता. लाखो शिवसैनिकांचे मंदिर असलेल्या याच आनंदाश्रमात ढोलताशे बडवत नोटा उडवण्यात आल्या. मिंर्धेच्या या हिडीस प्रकारामुळे तळपायाची आग मस्तकाला भिडली. त्यांच्या या मनोवृत्तीचं प्रदर्शन साऱ्या देशाने बघितलं. माझ्या साहेबांना तुम्ही पैशाने ओवाळता काय? अरे.. तुमच्यासारखे असे ५० मुख्यमंत्री त्यांच्यावरून ओवाळून टाकू. आता माफीबिफी जाऊ द्या, ठाणेकर जनताच या गद्दारांना जन्माची अद्दल घडवेल, अशा शब्दांत आनंद दिघे यांची पत्रे लिहिणारे नंदकुमार गोरुले यांनी मिंर्धेच्या पंटरांना अक्षरशः फोडून काढले. आनंदाश्रमात आनंद दिघे यांच्या तसबिरीभोवती नोटांची बंडले ओवाळून ती पायदळी तुडवल्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे...