ठाणे ( मुंबई ) चक्रधर मेश्राम :- २१ मे.२०२३:-
भाजप-शिवसेना (शिंदे गट) युती सरकारमध्ये 60 - 40 अशाप्रकारचा सत्ता मिळाली पाहिजे यासाठी नियोजित ‘फॉर्म्युला’ ठरलेला होता मात्र गडचिरोली जिल्हा भाजपाच्या कटकारस्थानामुळे नियोजन समितीमध्ये शिवसेनेच्या एकाही नेत्याला संधी देण्यात आली नाही. यामध्ये संघाच्या चड्डीवाल्यांचे फार मोठे कटकारस्थान आहे. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी विसरून चालणार नाही.
यासंदर्भातील यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात 11 भाजप नेत्यांची वर्णी लागल्याने शिवसेनेकडून निषेधही व्यक्त करण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्यात भाजपा- शिवसेना (शिंदे गट) युतीचे सरकार अस्तित्वात आले तेव्हापासून शिवसेनेतील नेत्यांना नेहमीच दुय्यम वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी स्थानिक नेते करतांना दिसून येतात.
राज्य किंवा जिल्हा पातळीवरील विविध समित्यांवर भाजपा नेत्यांचेच वर्चस्व आहे. शिवसेनेच्या नेत्यांची नावे मागवली जातात परंतु ती वगळण्यात येतात. गडचिरोली जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यांसाठी देखील 60 - 40 ‘ फॉर्म्युल्याप्रमाणे भाजपा - शिवसेनेच्या नेत्यांची नावे पाठविण्यात आले होते.
परंतु जाहीर करण्यात आलेल्या यादीत केवळ भाजप नेत्यांचीच नावे आहेत. शिवसेनेच्या एकाही नेत्याला त्यात समाविष्ट करण्यात आले नाही. या प्रकारामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे अनेक नेते दुखावले. भाजपने युती धर्माचे पालन केले नाही, असा आरोप होत आहे.आणि ते करणारही नाही. हे विषेश.
समितीत भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य बाबूराव कोहळे, नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, भाजपचे नेते गोविंद सारडा, नगर सेवक प्रमोद पिपरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर, कलाम पिर मोहम्मद, सदानंद कुथे, सुनिल बिश्वास यांचा समावेश आहे.
शिवसेनेच्या नेत्यांनाही जिल्हा नियोजन समितीमध्ये निवड करण्यात येईल काय❓ असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भाजप पक्षाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हा नियोजन निवड समितीमध्ये निवड करण्याकरिता यादी पाठवण्यात आली होती. ती यादी जाहीर झाली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गडचिरोलीच्या शिवसेनेची यादी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवली नसल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर झाली नाही. त्यामुळे आमदार होळी याप्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून हा विषय मार्गी लावणार असल्याचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी म्हटले आहे.
0 Comments