Ticker

6/recent/ticker-posts

बसचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, कारसह अनेक वाहनांना धडक, दोन ठार तीन गंभीर जखमी



 पुण्यात रात्रीच्या वेळी मोठा अपघात झाला आहे. एका बसचा ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाला आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
    
पुणे : बसचा ब्रेक फेल झाल्याने शहरात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पुणे शहरात एन आय बी एम उंड्री रोडवर हा अपघात झाला आहे. एन आय बी एम उंड्री रोडवर उताराला एका बसचा ब्रेक फेल झाला. या बसने दुचाकी, रिक्षा आणि बीएमडब्ल्यू कारसह अनेक वाहनांना धडक दिली. यामुळे भीषण अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन गंभीर जखमी झाले आहेत.

कोंढवा परिसरातील एनआयबीएम रोड परिसरात हा अपघात झाला. अचानक ब्रेक फेल झाल्याने समोर असलेल्या वाहनांना धडक दिली आहे. अपघातात एक रिक्षा, टेम्पो, दोन कार, एक दुचाकी, एक चारचाकी या वाहनांना बसने धडक दिली. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,कोंढवा परिसरातील असणाऱ्या एनआयबीएम रस्त्यावर आज सायंकाळच्या सुमारास खासगी बस चालली होती. मात्र पुढे जात असताना या बसचा अचानक ब्रेक फेल झाला. त्यामुळे या बसने समोर असणाऱ्या वाहनांना जोरात धडक दिली. त्यामुळे वाहने एकमेकांना अचानकपणे जोरात धडकली. आणि एकमेकांवर जोरात आदळली. या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. अन्य चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी वाहतूक सुरळीत केली.

जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा वर्दळीचा भाग आहे. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. 

Post a Comment

0 Comments