इर्मजन्सी अलर्ट सर्व्हसचा मॅसेज आल्यामुळे तुम्ही घाबरु नका - ॲड. चैतन्य भंडारी

इर्मजन्सी अलर्ट सर्व्हसचा मॅसेज आल्यामुळे तुम्ही घाबरु नका - ॲड. चैतन्य भंडारी जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे - कालपासून बहुतेक सर्वानाच एक मेसेज येतोय. मलाही आलाय ! त्याचाच स्क्रीनशॉट सोबत आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून चाचणी संदेश आहे असं म्हणत तारीख आणि वेळ त्यापुढे टाकलेली! असे मेसेज येत आहेत. आणि एक नव्हे तर कैक मेसेज असे एकाच मोबाईलवर संगणकावर किंवा इलेक्ट्रीक बाईकवर येत आहेत! या मेसेजमुळे पॅनिक होऊन जाऊ नका ! इतकेच आधी सांगतो. हि एक प्रकारची अशी सुविधा ऍक्टिव्हेट करण्याचे टेस्टिंग सुरु असून त्यामुळे भविष्यात तुम्ही कधी कुठं संकटात सापडला, अडचणीत आला, अपघातात अडकला तर तुमच्या नम्बरवरून एक इमर्जन्सी मेसेज तयार होऊन तो तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील मित्रांना पाठवला जाऊ शकतो. जेणेकरून त्यांना तुम्ही संकटात आहात हे कळून त्यांनी मग धावपळ करून तुम्हाला संकटातून बाहेर काढावे. यातलीच दुसरी एक सुविधा बहुतेक ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न सुरु असावा जो "इमर्जन्सी" नंबर म्हणून ब...