पोस्ट्स

मुल/चंद्रपूर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

*खेडी ते गोंडपिपरी रस्त्याच्या नियोजनशून्य बांधकाम व निकृष्ट बांधकामाविरोधात युवक काँग्रेसचे चक्काजाम आंदोलन* *आंदोलनातील मागण्या मान्य करण्याचे ठेकेदार व संबंधित प्रशासनाचे लेखी आश्वासन*

इमेज
विजय जाधव, मुल :- मौजा खेडी ते गोंडपिपरी रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट होत असून कित्येक वर्षापासून काम रखडलेले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना व रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला धोका असून अपघाताचे प्रमाण वाढलेले होते.  रस्त्यावरील खड्ड्यांमुळे व कामाच्या दिरंगाईमुळे तसेच ठेकेदार व अधिकाऱ्याच्या मनमाणी कारभारामुळे रस्त्याच्या कामाचा सत्यानाश झालेला आहे.ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी व रस्त्याचे बांधकाम सुरळीत करण्यासाठी  युवक काँग्रेसकडून चांदापूर फाटा व घोसरी फाटा या ठिकाणी तीव्र नारेबाजी करून रस्ता जाम करून आंदोलन करण्यात आले. सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी संपूर्ण चक्काजाम करून सदर महामार्ग बंद पडला. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड ताण सहन करावा लागला. आंदोलनादरम्यान संबंधित ठेकेदाराचे प्रतिनिधी, अभियंता श्री. चव्हाण, श्री. गुप्ता , उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, मुल पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुमित परतेकी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, राकेश रत्नवार, राजू मारकवार, सुमित आरेकर,दशरथ वाकुडकर, दीपक पाटील वाढई, घनश्याम येनुरकर यांच्याशी सविस...

काँग्रेस-युवक काँग्रेस तर्फे घोसरी फाट्यावर चक्काजाम आंदोलन सुरू - रहदारी ठप्प:प्रवाशांना अडचणी

इमेज
विजय जाधव प्रतिनिधी =========================== https://youtu.be/G7icGw9FvbY       मुल: गोंडपिपरी ते खेडी या मार्गाचे रखडलेले काम त्वरित करावे या प्रमुख मागणीला घेऊन घोसरी फाट्यावर चक्काजाम आंदोलन सुरू आहे.ठरल्याप्रमाणे नियोजित वेळेत खेडी गोंडपिंपरी रोडचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्यात यावे ,तसेच झालेल्या कामातील अपव्यवहार, भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी,  प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, सदर मार्गावर ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आलेले खड्डे त्वरित बुजवण्यात यावे, सीडीवर्कची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यात यावा, सदर मार्गावर अपघातात यांचे जीव गेले त्यांना तात्काळ कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, चार वर्षापासून रेंगाळत असलेले काम पूर्ण करण्यात यावे इत्यादी प्रमुख मागण्या घेऊन मुल तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने आज दिनांक 16 मे 2023 रोजी ठरलेल्या वेळेत चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले असून सदर आंदोलनाचा वनव...