Ticker

6/recent/ticker-posts

*खेडी ते गोंडपिपरी रस्त्याच्या नियोजनशून्य बांधकाम व निकृष्ट बांधकामाविरोधात युवक काँग्रेसचे चक्काजाम आंदोलन* *आंदोलनातील मागण्या मान्य करण्याचे ठेकेदार व संबंधित प्रशासनाचे लेखी आश्वासन*




विजय जाधव,
मुल :- मौजा खेडी ते गोंडपिपरी रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट होत असून कित्येक वर्षापासून काम रखडलेले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना व रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला धोका असून अपघाताचे प्रमाण वाढलेले होते.  रस्त्यावरील खड्ड्यांमुळे व कामाच्या दिरंगाईमुळे तसेच ठेकेदार व अधिकाऱ्याच्या मनमाणी कारभारामुळे रस्त्याच्या कामाचा सत्यानाश झालेला आहे.ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी व रस्त्याचे बांधकाम सुरळीत करण्यासाठी  युवक काँग्रेसकडून चांदापूर फाटा व घोसरी फाटा या ठिकाणी तीव्र नारेबाजी करून रस्ता जाम करून आंदोलन करण्यात आले. सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी संपूर्ण चक्काजाम करून सदर महामार्ग बंद पडला. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड ताण सहन करावा लागला.
आंदोलनादरम्यान संबंधित ठेकेदाराचे प्रतिनिधी, अभियंता श्री. चव्हाण, श्री. गुप्ता , उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, मुल पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुमित परतेकी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, राकेश रत्नवार, राजू मारकवार, सुमित आरेकर,दशरथ वाकुडकर, दीपक पाटील वाढई, घनश्याम येनुरकर यांच्याशी सविस्तर चर्चा करून आंदोलनातील संपूर्ण मागण्या लेखी आश्वासन देऊन मान्य केल्या.
अपघातात मृत पावलेल्या व जखमींना आर्थिक मदत करण्यात येईल, सदर रस्त्याचे बांधकाम दोन महिन्यात पूर्ण करण्यात येईल, संपूर्ण रस्त्यावर दिशा निर्देशक
लावून सूचनांचे पालन केले जाईल अशा विविध मागण्यांना घेऊन लेखी आश्वासन दिले. सदर आंदोलनाला यशस्वी करण्याकरता काँग्रेसचे युवा नेते प्रशांत उराडे, काँग्रेस तालुका युवक अध्यक्ष पवन निलमवार , नांदगावचे सरपंच हिमाणीताई वाकुडकर, जालिंदर बांगरे, उपसरपंच सागर देऊरकर, बेंबाळचे सरपंच चांगदेव केमेकार, नरेश कोरडे, धीरज गोहने, योगेश शेरकी, त्रिमूर्ती नाहगमकर, उमाकांत मडावी, दीपक कोटगले, सुहास वाढई, समीर काळे तथा युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Post a Comment

0 Comments