Ticker

6/recent/ticker-posts

नांदगाव हायस्कूल मध्ये शिक्षकांची दहा पदे रिक्त: सांगा सीईओ साहेब, कशी भरवणार शाळा




विजय जाधव:मुल पंचायत समिती अंतर्गत नांदगाव जिल्हा परिषद हायस्कूल ही परिसरात नामांकित शाळा म्हणून सुपरिचित आहे. या जीप हायस्कूल मधून अनेक विद्यार्थी घडलेले आहेत.व आज महत्त्वाच्या हुद्द्यावर विराजमान आहेत.
 परंतु जिल्हा परिषदेच्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या शाळेला आज अवकळा आल्याचे दिसून येत आहे. नांदगाव हे परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले उत्तम बाजारपेठ आणि शैक्षणिकदृष्ट्या,भौगोलिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या सर्व संपन्न नांदगाव हे गाव जिल्ह्यात परिचीत आहे. या गावात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती तसेच मुल पंचायत समितीचे माजी उपसभापती, इत्यादी राजकीय नेते या गावातील रहिवासी आहेत. परंतु या गावाकडे शैक्षणिक दृष्ट्या कुणाची नजर लागली कुणास ठाऊक!
      एकंदरीत जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे गिरवीतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या शाळेत गेल्या अनेक सत्रा पासून पुरेसे शिक्षक नसून मुख्याध्यापक, अध्यापकाचे पद रिक्त आहे. कनिष्ठ सहायकाचे सुद्धा पद रिक्त आहे.आणि इतर शिक्षकांची आठ पदे रिक्त आहेत.
       यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांना शाळा कमिटीने निवेदन सादर करून शिक्षकांची मागणी केली असता त्यांनी शिष्टमंडळाच्या समोरच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे फोन करून नांदगाव जि. प. हायस्कूलमध्ये शिक्षकांची मागणी केली असता त्यांनी नव्याने शिक्षक भरती घेण्यात यावी परत शिक्षक पाठवण्यात येतील. या जिल्ह्यामध्ये सेवानिवृत्त होणारे शिक्षक जास्त असून शिक्षक भरती नसल्यामुळे तासिकेप्रमाणे शिक्षक घेण्यात यावे अशा सूचना माननीय मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी सुचविले.
     एक सत्र निघून गेले परंतु आगामी काळात चालू सत्र सुरू होणार असून या शाळेत शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणार कोण? हा गंभीर प्रश्न विद्यार्थी व पालकांसमोर निर्माण झाला आहे. 
       याबाबत शालेय व्यवस्थापन समिती, शाळा कमिटी यांनी शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हा परिषदेकडे, पालकमंत्राकडे संबंधित विभागाकडे अनेक अर्ज विनंती केलेले आहेत. परंतु जिल्हा परिषदे कडून अजून पर्यंत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
      चालू सत्रामध्ये उपरोक्त शिक्षकांची मुख्याध्यापकांची आणि कनिष्ठ सहायकांची रिक्त पदे भरण्यात यावी, आणि शालेय कामकाज सुरळीत करावा अशी मागणी जि प हायस्कूलचे नांदगावचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश जी इनमवार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments