बिग ब्रेकिंग : विजेच्या धक्क्याने दोन तरुण कामगारांचा जागीच मृत्यू!
✍️ मुल तालुका प्रतिनिधी
मुल तालुक्यात आज दुर्दैवी घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नवेगाव भुजला येथील दोन तरुण मिस्त्री बांधकामाच्या कामासाठी जुनासुर्ला गावात गेले असता, झालेल्या अपघातात त्यांचा करुण अंत झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, नवेगाव भुजला येथील विनोद मुकुंदा बोरकुटे आणि हरिदास शशिकांत चुधरी हे दोन्ही कामगार बांधकामाचे काम करत होते. काम सुरू असतानाच गावातून जाणाऱ्या विजेच्या उच्चदाब तारांचा चुकीने स्पर्श झाला आणि क्षणात विजेचा तीव्र धक्का बसल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
अचानक घडलेल्या या भीषण घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत तरुण हे आपल्या कुटुंबाचे कर्ते पुरुष असल्याने त्यांच्या अकाली निधनामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहत प्रशासनाने अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
ही घटना फक्त दोन तरुणांचे जीव घेऊन गेली नाही तर गावोगाव असलेल्या असुरक्षित विजेच्या तारांचे संकट अधोरेखित करून गेली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने जबाबदारीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
👉 या दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती व पुढील घडामोडी दरारा 24 तास न्यूज नेटवर्क आणि वैनगंगा न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवर वेळोवेळी प्रसारित करण्यात येतील.
0 टिप्पण्या
Thanks for reading