👉 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
🌿 सेवापर्व व अमृत महोत्सवांतर्गत व्यापक वृक्षलागवड कार्यक्रम
चंद्रपूर प्रतिनिधी | दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त "सेवापर्व" तसेच "अमृत महोत्सव" या उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर वनवृत्तात व्यापक वृक्षलागवड मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
"सेवापर्व" हा उपक्रम २ ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंतीपर्यंत साजरा करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून या वृक्षलागवड कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या अंतर्गत चंद्रपूर वनवृत्तातील तीन वनविभागांमधील एकूण १९ परिक्षेत्रात तब्बल १,१२,५४८ रोपांची लागवड करण्यात आली. त्याचे तपशील पुढीलप्रमाणे –
- चंद्रपूर वन विभाग : ३७,९९९ रोपे
- ब्रह्मपुरी वन विभाग : ३०,००० रोपे
- सेंट्रल चांदा वन विभाग : ४४,५४९ रोपे
या उपक्रमात स्थानिक संयुक्त वन व्यवस्थापन समित्या, वन कर्मचारी, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच विविध औद्योगिक कंपन्या यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
वनविभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या वृक्षलागवड मोहिमेमुळे
- जैवविविधतेचे संवर्धन,
- पर्यावरण संतुलनाची जपणूक,
- तसेच हरित चंद्रपूर निर्मितीकडे वाटचाल या तिन्ही उद्दिष्टांना मोठी चालना मिळाली आहे.
"अमृत महोत्सव" साजरा करण्यासोबतच "हरित भारत" या संकल्पनेला या उपक्रमातून बळकटी मिळाली असून, भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत पर्यावरण निर्मितीचे कार्य अधिक गतीमान झाले आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading