दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
सेवापर्व व अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत वनविभागाचे विशेष आयोजन
चंद्रपूर : जीवनदास एल. गेडाम
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त देशभरात “सेवापर्व” तसेच “अमृत महोत्सव” या विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर वनविभागानेही विविध सामाजिक व पर्यावरणीय कार्यक्रमांचे आयोजन करून लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा संकल्प केला आहे.
विभागीय वन अधिकारी श्री. राजन तलमले यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी या उपक्रमांतर्गत वृक्षलागवड, स्वच्छता मोहिमा, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे, तसेच पर्यावरणाबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. “सेवापर्व” या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडत नागरिकांमध्ये सेवा भाव जागविणे.
यासोबतच “अमृत महोत्सव” निमित्त नागरिकांना शाश्वत विकास, हरित जीवनशैली व निसर्ग संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात येईल. वनविभागातील अधिकारी व कर्मचारी स्वतः सहभागी होत या मोहिमेला गती देतील.
राजन तलमले म्हणाले, “चंद्रपूर जिल्हा हा नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असला तरी पर्यावरणाच्या संतुलनासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. या उपक्रमांतून समाजात वृक्षप्रेम, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होईल.”
या कार्यक्रमाचे वृत्त व माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून सर्व वृत्तपत्रे व विविध माध्यमांतून प्रसारित करण्यात येणार असून, जिल्हाभर या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading