पोस्ट्स

पोंभूर्णा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

तालुक्यातील आदिवासी लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभापासून वंचित

इमेज
पोभुर्णा : तालुक्यातील आदिवासी लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभापासून मागील पाच महिन्यांपासून वंचित असल्याने अनुसूचित जमाती लाभार्थ्यांची वाताहात होऊन उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारने अलीकडच्या काळात आर्थिक दृष्ट्या दृबर्ल, अपंग, निराधार,विधवा, सिकलसेल इत्यादी लोकांना संजय गांधी निराधार योजना सुरू करुन हित जोपासले गेले. परंतु सदर योजनेत केवळ आदीवासी प्रवर्गात मोडत असलेल्या लाभार्थ्यांचे अनुदान अडवून ठेवल्याने आदीवासी लाभार्थ्यांना संध्याकाळची चुल पेटवने अवघड बाब झाली आहे.  पाच महिन्यांपासून मानधन लापता असल्याने लाभार्थ्यांत रोष निर्माण होऊन मायबाप आम्ही कसे जीवन जगायचे अशी आर्त हाक कानावर पडत आहे. तेव्हा पालकमंत्री महोदयांनी याकडे लक्ष केंद्रित करून आदीवासी निराधार लाभार्थ्यांना अनुदानासाठी योग्यती कारवाई करावी अशी मागणी आदीवासी निराधार लाभार्थ्यांकडुन करण्यात येत आहे.

शिवसेनेची आज पोंभुर्णा येथे आढावा बैठक: जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिर्हे राहणार बैठकीला उपस्थित

इमेज
सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका प्रतिनिधी      शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आज दिनांक 26 मार्च 2023 रोजी राज राजेश्वर सभागृह पोंभुर्णा येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.      शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. सदर बैठक दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली असून या बैठकीला प्रमुख मार्गदर्शन जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गिर्हे हे करणार आहेत.

शेतकऱ्यांना लुटणारी बोगस व्यापाऱ्यांची टोळी सक्रिय, वजन काटे मारीने शेतकरी त्रस्त दिघोरी येथील व्यापाऱ्याला वजन काट्याची चोरी करताना पकडले एक लाखाचे प्रकरण चार लाखावर थांबले? कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

इमेज
कृषी उत्पन्न बाजार समितीचीच चौकशी करण्याची राहुल पाल यांची मागणी तालुक्यात शेतकऱ्यांना लुटणारी बोगस व्यापाऱ्यांची टोळी सक्रिय असून "चोर तो चोर,वर शिरजोर" अशीच प्रचिती या तालुक्यात बघावयास मिळत आहे. आणि आश्चर्य म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती या सर्व प्रकारावर मौन बाळगून मूग गिळून बसून आंधळेपणाचा सोंग घेत आहे. त्यामुळे या समितीची सुद्धा वरिष्ठ पातळीवरील चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येईल असे जाणकार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जूनगाव येथे यापूर्वी दोन व्यापाऱ्यांनी दोनदा एकाच कास्तकाराला वजन काट्याने लुटताना रंगेहात इलेक्ट्रॉनिक रिमोट असलेला यंत्र पकडला. इतकी मोठी चोरी होऊन सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती केवळ सेस फाडल्याच्या या नावाखाली थातूरमातूर चौकशी करून त्यांना सोडून देत असल्यामुळे यात कृषी उत्पन्न बाजार समितीचा तर हात नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. इतके प्रकरण झाले असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याऐवजी पाच पट सेस फाडून कारवाई केल्याचा बनाव दाखवत आहेत. याचा अर्थ थेट आर्थिक गैरव्यवहार करून तेरी भी चूप मेरी भी चुप असा प्रकार ह...