*निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार*

*निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार* *ब्रह्मपुरी येथे आढावा बैठक - गुणवत्ता दर्जा तपासणीसाठी समिती नेमण्याचे निर्देश* दरारा 24 तास चंद्ब्ररह्मपुरी विधानसभा क्षेत्रात जलजीवन मिशन अंतर्गत नागरिकांना शुद्ध पेयजल पुरवठा करण्यासाठी शासन स्तरावरून आपण कोट्यावधींचा निधी खेचून आणला. सदर विकास कामांचे कंत्राट घेणारे कंत्राटदार यांनी बहुतांश ठिकाणी विहित कालावधीत कामे पुर्ण केली नसल्याने व बऱ्याच ठिकाणच्या कामाच्या तक्रारी प्राप्त झाल्याने यावर अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत या संदर्भात विशेष समिती मार्फत विकास कामांची चौकशी करून निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार असे ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित अधिकारी व कंत्राटदारना ठणकावले. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही, सावली व ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्राम खेड्यांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नागरिकांना शुद्ध पेयजल उपलब्ध व्हावे याकरिता पाणीपुरवठा...