ब्रम्हपुरी:- 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत जागतिक दिव्यांग दिन सप्ताहाचे औचित्य साधून प्रेरणा देणारे डायट प्राचार्य श्री. आर. हिवारे सर, प्रा. श्री. धनंजय चाफले व क्षेत्रिय अधिकारी प्रा. श्री.विनोद लवांडे तसेच प्रमुख मार्ग दर्शक मा. गटशिक्षणाधिकारी ए. चिलबूले व विस्तार अधिकारी एस. एस. भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौशी येथे विद्यार्थ्यांमध्ये समता व समानता प्रस्थापित होण्याच्या उद्देशाने सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याव्यतिरिक्त म्हसली केंद्रातील शिक्षकांची एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करून यात दिव्यांग प्रकार व अध्ययन शैली तसेच त्यांच्या समस्या याविषयी कु. छाया रामाजी विंचूरकर, समावेशित शिक्षण तज्ञ यांनी मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणाचे आयोजन म्हसली केंद्राचे केंद्र प्रमुख पी. नान्हे यांनी केले. सदर प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. बुराडे, व सहाय्यक शिक्षक नंदकिशोर डोंगरावर, नरेंद्र इनकने, रेखा ढोबळे, विशेष शिक्षक सतिश कायरकर या सर्वांनी मोलाची मदत केली.
0 Comments