Ticker

6/recent/ticker-posts

चंदू का चाँद खिलेगा या परिवर्तन का दिपक जलेगा- बेंबाळ ग्रामपंचायत निवडणूकीत दोन गटात रणधुमाळी




जिवनदास गेडाम(विशेष प्रतिनिधी)

बेंबाळ : जिल्ह्यातील मुल तालुका हा माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचा गृह क्षेत्र,याच तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेली ग्रामपंचायत म्हणजे बेंबाळ ग्रामपंचायत होय.
       सध्या या बेंबाळ ग्रामपंचायतचा निवडणूक प्रचार चालू आहे. या निवडणूकीत मुल पंचायत समितीचे माजी सभापती चंदू मारगोनवार यांचे जन्मगाव असल्याने आणि सामाजिक चळवळीत अग्रभागी राहून जनतेला न्याय देणारे दिपक वाढई यांचेही गृहगाव असल्याने बेंबाळ ग्रामपंचायत निवडणूकीत या दोन राजकीय धुरंधरांमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली असून आप-आपले सरपंच पदाचे व सदस्य पदाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. 

 जिंकुन येण्यासाठी मोठ-मोठ्या शकला लढवल्या जात असून दोन गटात काट्याची टक्कर होत असल्याचे चित्र पहायला मिळते आहे. मात्र या राजकीय रणधुमाळीत चंदू का चाँद खिलेगा या परिवर्तन का दिपक जलेगा हे निवडणूक निकाला नंतर पहायला मिळणार आहे.

विकासपुरुष ग्रामविकास आघाडी व परिवर्तन पॅनेल आमनेसामने

बेंबाळ ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपा प्रणित विकासपुरुष ग्रामविकास आघाडीचे मुन्ना बालाजी कोटगले तर कांग्रेस प्रणित परिवर्तन पॅनेल चे चांगदेव काशिनाथ केमेकार आमनेसामने निवडणूक रिंगणात उतरले असून प्रचाराच्या थोफा धडाडत आहेत. या दोन्ही उमेदवारांसाठी विकासपुरुष ग्रामविकास आघाडी चे नेतृत्व करणारे चंदू मारगोनवार व परिवर्तन पॅनेल चे दिपक वाढई आमनेसामने रिंगणात उतरले आहेत. मात्र या दोघांपैकी मतदार कोणाच्या नेतृत्वातील उमेदवारांना कौल देतात, की पर्यायी उमेदवार निवडतात हे अजूनही अस्पष्ट आहे. हे कोडं मात्र निकाला नंतर स्पष्ट होईल. दुहेरी लढत होईल असे वर्तविल्या जात असले तरी वंचित ने उडी घेतल्यामुळे समीकरण वेगळे होऊ शकते असेही जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.

वंचित बहुजन आघाडीनेही घेतली उडी

बेंबाळ ग्रामपंचायत निवडणूकीत अनु.जाती, जमाती मतदार मोठ्या संख्येने आहेत. याचाच फायदा घेत आपल्या चार सदस्य पदाच्या उमेदवारी सह सरपंच पदासाठी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार मधुकर गेडाम हे सुद्धा विजयासाठी मोर्चेबांधणी करुन चारही सदस्य निवडून आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येथे निवडणूक जोरदार
 रंगणार आहे.

गाव तसं चागलं पण राजकारणाने बरबटलेलं!

मुल तालुक्यातील बेंबाळ गाव हे फुले-शाहु-छत्रपती-बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे केंद्र स्थान आहे. या गावातून अनेक सामान्य कार्यकर्ते मोठी राजकीय भरारी घेत जिल्ह्यापर्यंत दिग्गज ठरले. पण गावातील सोयीसुविधा पुरत्या रखडल्या गेल्या. आजही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. अनेक योजना धुळखात कागदावर गुडांळून फाईलबंद आहेत. कारण राजकारणाची पोळी भाजण्यात नेते मंडळी व्यस्त राहीली. त्यामुळं श्वाश्वत विकास झाला नाही.


बेंबाळ गाव ३१०० मतदार असलेलं मोठं गाव आहे. या मतदारांच्या मतदानातून सरपंच निवडला जाणार आहे. सरपंच पदासाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. परंतु एकाला सरपंच म्हणून गावाच्या विकासासाठी पाठविण्याची जबाबदारी जागरुक मतदारावर येऊन ठेपली आहे. म्हणून या सहाही उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्राच्या मशीन मध्ये बंद होणार आहे. निकाला नंतर कोण भाग्यवान ठरेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments