अतिवृष्टीने पडझड झालेल्या पूरग्रस्तांना प्रधानमंत्री आवास योजनेत प्राधान्य द्यावे। प्रहार सेवक विनोद उमरे यांची मागणी

*✍️शुभम गजभिये प्रतिनिधी पळसगांव मो..9021083825* जिल्हासह चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली होती.त्यामध्ये कोणाला अपंगत्व तर लोकांना जीव गमवा लागला आहे.अनेक बांधवांचे मोठ्या प्रमाणात घरांची नुकसान सुद्धा झाले.त्यामुळे अनेक गावातील काही घराचे अंशत:तर काय चे पूर्णत:नुकसान झाले असून निवाऱ्याचा प्रश्र निर्माण झाला आहे. अशावेळी तात्काळ घराचे बांधकाम करु शकत नाही म्हणून विशेष बाब म्हणून प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पूरग्रस्तांना प्राध्यान्य देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली..