(चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ) आज दिनांक 19/01/2023 गुरुवार रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ वरोरा येथे MCX कॉटन किंवा कापूस फायदे बाजार शेतकऱ्यांसाठी या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड वरोरा यांच्या तर्फे संयुक्तरीत्या आयोजित करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने प्रशांत चासकर, कुशाग्र मुंगी तसेच रवींद्र मनोहरे कृषी उपसंचालक आत्मा चंद्रपूर, तालुका कृषी अधिकारी . एस भोयर, दीपक बेदरकर MCDC, प्रशांत नवले MSWC, .यशवंत सायरे, संजय नारळे, हिरालाल बघेले आबिद अली बंडू डाखरे बळीरामजी डोंगरकर गणेश वाभिटकर व बालाजी धोबे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष . दीक्षा जानी व्यवस्थापक MCX यांनी शेतकऱ्यांसाठी कापूस वायदे बाजार चे महत्व थोडक्यात समजून सांगितले. प्रशांत नवले यांनी वखार महामंडळाची शेतकऱ्यांसाठी असणारी भाड्यातील सूट मालाची सुरक्षा व उपलब्ध असलेले तारण कर्ज इत्यादींची माहिती दिली. रवींद्र मनोरे शेतकऱ्यांना कापूस निघल्याबरोबर त्य...