आज दिनांक 19/01/2023 गुरुवार रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ वरोरा येथे MCX कॉटन किंवा कापूस फायदे बाजार शेतकऱ्यांसाठी या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड वरोरा यांच्या तर्फे संयुक्तरीत्या आयोजित करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने प्रशांत चासकर, कुशाग्र मुंगी तसेच रवींद्र मनोहरे कृषी उपसंचालक आत्मा चंद्रपूर, तालुका कृषी अधिकारी . एस भोयर, दीपक बेदरकर MCDC, प्रशांत नवले MSWC, .यशवंत सायरे, संजय नारळे, हिरालाल बघेले आबिद अली बंडू डाखरे बळीरामजी डोंगरकर गणेश वाभिटकर व बालाजी धोबे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष . दीक्षा जानी व्यवस्थापक MCX यांनी शेतकऱ्यांसाठी कापूस वायदे बाजार चे महत्व थोडक्यात समजून सांगितले. प्रशांत नवले यांनी वखार महामंडळाची शेतकऱ्यांसाठी असणारी भाड्यातील सूट मालाची सुरक्षा व उपलब्ध असलेले तारण कर्ज इत्यादींची माहिती दिली. रवींद्र मनोरे शेतकऱ्यांना कापूस निघल्याबरोबर त्याचे रूपांतर गाठी मध्ये करून घ्यावे याचे महत्त्व समजून सांगितले. त्यांनी सांगितले की घरच्या घरी कापूस साठवल्यास त्या कापसाचे कंटेमिनेशन होते तसेच आपण उष्णकटिबंधात राहत असल्यामुळे प्रतिक्विंटल आठ ते दहा किलो वजन घट येते. कापसाचे गाठीत रूपांतर केल्यास शेतकऱ्याला गाठ विकता येईल व सरकी वेगळी विकता येईल व या व्यापारी प्रक्रियेतील नफा थेट शेतकऱ्यांच्या खिशात जाईल हे समजून सांगितले. उदाहरणादाखल त्यांनी कोंढाळा येतील बोधाने यांचा गटाचे उदाहरण दिले त्यांच्या गटातील जवळपास 30 शेतकऱ्यांनी त्यांच्या कापसाचे गाठीत रूपांतर केले व हजार रुपये प्रतिक्विंटल असा अधिकचा नफा कमविला. प्रशांत चासकर यांनी पण त्याच प्रक्रियेतील नफा अजून कसा वाढवता येईल व शेअर बाजार कापूस हेजिंग कच्या माल विक्री मागणी प्रक्रीया यातून होणारे शेतकऱ्याचे आर्थिक लाभ याकरीता शेतकरी उत्पादक नव्हे तर परिवर्तन उद्योैजक भुमिका पार पाडण्याची गरज आहे प्रशिक्षण प्रबोधन यामुळे मार्केटमध्ये बदल घडत असल्याचे उदाहरण देत माहिती दिली.
0 Comments