मात्र पुढार्यांना मान देऊनच आरोपींवर कारवाई करण्याची ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांची भूमिका
!
ठाणेदाराच्या कार्यवाहीचे तालुक्यात होत आहे स्वागत
तालुका प्रतिनिधी
शहरात काही ठिकाणी चिल्लर आणि ठोक जुगार खेळल्या जातो. या जुगारात अर्थात व्यवसायात! अनेक गोरगरीब तरुणांचे संसार उध्वस्त होतात. जुगारात बसलेला व्यक्ती आपल्या घरचे भांडीकुंडी सुद्धा जुगारात हारतो. अशी परिस्थिती नुसती चित्रपटातच पाहायला मिळत नसून प्रत्यक्षात असे प्रकार पाहायला मिळतात. असे असतानाही नामवंत आणि श्रीमंत या खेळाशिवाय रहात नाही. असा प्रत्येक आज येथे आला.
शहरात काही नामवंत आणि छोटे-मोठे असे पोलिसांच्या धाडीत जुगार खेळताना हस्तगत झाले. मात्र खेळताना आनंद वाटला, पोलीस येताच त्यांची दमछाक नव्हे घाबरगुंडी उडाली.
पोलिसांनी आपली रीतसर कारवाई करून सर्व जुगार यांना ठाण्यात जमा केले. ही वार्ता शहरात पसरतात काही राजकीय पुढारी या जुगारांना सोडवण्यासाठी पोलीस ठाण्याच्या येरझारा मारू लागले. मात्र ठाणेदार धर्मेंद्र जोशी हे आपल्या कर्तव्यात जबाबदार अधिकारी म्हणून ओळखले जातात, त्याचा प्रत्यय त्यांनी आणून देत या सर्व लोकांना सहानुभूतीपूर्वक व आरोपींना साथ देणे योग्य नाही इत्यादी बाबी समजावून सांगत कारवाई करण्याचे बजावले. पुढील कारवाई सुरू आहे. तपास पोलीस अधिकारी धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनात त्यांचे पथक करत आहे.
0 Comments