पोस्ट्स

भद्रावती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वरोरा-भद्रावती विधानसभा तिकीटासाठी शिवसैनिकांची जोरदार मागणी, मुकेश जीवतोडेंच्या उमेदवारीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आवाहन

इमेज
वरोरा-भद्रावती विधानसभा तिकीटासाठी शिवसैनिकांची जोरदार मागणी, मुकेश जीवतोडेंच्या उमेदवारीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आवाहन महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती  भद्रावती दि.21:' महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या (काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत 75 वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला यावा, अशी जोरदार मागणी उचलली जात आहे. आज शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयात मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आवाहन करत मुकेश जीवतोडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत, "75 वरोरा-भद्रावती शिवसेनेच्या वाट्याला आलीच पाहिजे!" आणि "मुकेश जीवतोडेंना तिकीट मिळालेच पाहिजे!" अशा आवाजात आपली मागणी व्यक्त केली. शिवसैनिकांचे म्हणणे आहे की, मुकेश जीवतोडे यांनी वरोरा-भद्रावती मतदारसंघात शिवसेनेचे संघटन मजबूत केले आहे आणि त्यांच्या नेतृत्वात अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. युवकांना रोजगार मिळवून देणे, शेतकरी आणि व...

जय जगन्नाथ मंडळातर्फे वीर बाबुराव शेडमाके व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृतिदिन संपन्न

इमेज
जय जगन्नाथ मंडळातर्फे वीर बाबुराव शेडमाके व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृतिदिन संपन्न महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि 21:- राष्ट्रसंताचे विचार च भारत देशाला सुजलाम सुफलाम बनवू शकतात तसेच वीर बाबुराव शेडमाके यांचा पराक्रम उजूनही प्रेरणा देणारा असून त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करावी असे प्रतिपादन करुन स्थानीक गवराळा वॉर्ड येथील जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ तर्फे राष्ट्र संत तुकडोजी महाराज व वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके स्मृतिदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे जेष्ठ सदस्य नीलकंठ आत्राम, ज्ञानेश्वर परचाके श्यामराव खापने, उद्धव निळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  याप्रसंगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव डोगें, बाबाराव नीखाडे, राजू माडेकर, विनोद सावनकर, गणेश ढोके, रमेश परचाके, विलास खापने यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सू त्रसंचालन लिमेश माणूसमारे तर आभारप्रदर्शन पांडूरंग कोयचाडे यांनी केले. खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शिवसेनेचे वरोरा येथील मध्यवर्ती कार्यालय शिवालय येथे आढावा सभेचे आयोजन करण्यात आले.

इमेज
शिवसेनेचे वरोरा येथील मध्यवर्ती कार्यालय शिवालय येथे आढावा सभेचे आयोजन करण्यात आले. महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.19:- 75-वरोरा भद्रावती विधानसभा आगामी महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असतांना वरोरा विधानसभेतील शिवसेना पदाधिकारी यांना संघटनात्मक महत्वपूर्ण मार्गदर्शक सूचना देण्याकरीता वरोरा विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरीता चंद्रपूर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पक्षप्रमुख यांचे कडुन वेळोवेळी येणारे आदेशाचे पालन करुन निवडणुकीला समोरे जायचे आहे अश्या सुचना पदअधिकारी यांना देण्यात आल्या. सभेला चंद्रपूर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख रोहन कुटेमाटे, महिला जिल्हा संघटीका नर्मदाताई बोरेकर, वरोरा तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकार, भद्रावती तालुकाप्रमुख नरेद्र पढाल,भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, युवती जिल्हा अधिकारी, प्रतिभा मांडवकर, भद्रावती महिला तालुका संघटीका आशाताई ताजणे, वरोरा तालुका महिला सं...

नगर परिषद भद्रावतीच्या चित्रकला स्पर्धेत अन्वी लोणे प्रथम

इमेज
महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती  भद्रावती दि.14 : स्वच्छ सर्वेक्षण २०२४ माझी वसुंधरा अभियानांतर्गत भद्रावती नगर परिषदेने हाती घेतलेल्या स्वच्छता ही सेवा २०२४ अभियानातील नागरिकांचा सहभाग या घटकांतर्गत आयोजित चित्रकला स्पर्धेत अन्वी वतन लोणे हिने प्रथम क्रमांक पटकाविला.  स्वच्छता ही सेवा २०२४ हे अभियान भद्रावती नगर परिषदेतर्फे १४ सप्टेंबर ते १ऑक्टोबर २०२४ या पंधरवाड्यात राबविण्यात आले. याच अभियानाचा एक भाग म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधींना त्यांच्या जयंती निमीत्त आदरांजली अर्पण करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.  यामध्ये वर्ग १ ते ४ या क गटातून लोकमान्य ज्ञानपीठ येथे वर्ग ४ मध्ये शिक्षण घेत असलेली अन्वी वतन लोणे हीने प्रथम क्रमांक पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र तसेच सायकल देवून अन्वीला गौरविण्यात आले. यावेळी नगर परिषद भद्रावतीच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. विशाखा शेळकी, उपमुख्याधिकारी विजयकुमार जांभुळकर, लिपीक (आरोग्य विभाग) दिनेश माशीरकर, स्वच्छता निरीक्षक उमेश ब्राम्हणे, शहर समन्वयक कलीम शेख यांनी कौतुक केले. सदर उपक्रम ...

अहेतेशाम अली यांची देवालय सोसायटी येथील शारदा महिला मंडळाला भेट

इमेज
अहेतेशाम अली यांची देवालय सोसायटी येथील शारदा महिला मंडळाला भेट महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती  भद्रावती,दि.११:- शहरातील विंजासन रोड भद्रावती देवालय सोसायटीला नुकतेच 4 वर्ष झाले असून पुरुष मंडळी दरवर्षी गणेश उत्सव साजरा करत असतात.या दरम्यान महिलांनी सुद्धा पुढाकार घेऊन या वर्षीपासून शारदा उत्सवाला सुरवात केली. या निमित्याने माजी नगराध्यक्ष नगर परिषद,वरोरा तथा वरोरा भद्रावती विधानसभा नेता मा. श्री.अहेतेशाम अली यांची सोसायटी वासीयांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थिती दर्शविली सोसायटीच्या वतीने स्वागत करण्यात आले.तसेच त्यांच्यासह  श्री.धर्मेंद्र हवेलीकर, श्री.रविद्र पवार मान्यवर उपस्थित होते. यावेळी भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सखोल विविध विषयांवर समस्येवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी सोसायटी मधील देवालय शारदा महिला मंडळाच्या पदाधिकारी  सौ.निलेशा बिस्वास, सौ.हर्षदा चटपल्लीवार,सौ.प्रियंका राजूरकर, सौ. रेश्मा मेंघरे, सौ. रेखा सुंकुरवार, सौ.हिना चंदनकर, सौ.सिमा मुळे, सौ.पल्लवी शर्मा,सौ. सोनाली सुकारे, सौ. किरण राऊत,सौ.समृद्धी खैरकर, तसेच पुरुषांमध्ये हंसराज नागपुरे, अंजय्या...

*कंत्राटी कामगारांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात* - *सिद्धार्थ सुमन*

इमेज
*कंत्राटी कामगारांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात* - *सिद्धार्थ सुमन* *भद्रावती* :- नगर परिषद भद्रावती येथे मागील आठ ते दहा वर्षापासून कार्यरत कंत्राटी कामगारांच्या कामबंद आणि ठिय्या आंदोलनास बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया ने समर्थन दिले असून कंत्राटी कामगारांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची महाराष्ट्र राज्य सचिव सिद्धार्थ सुमन यांनी केलेली आहे. कामगार कायदा 1948 नुसार कामगार विभाग महाराष्ट्र शासनाची दि. 15/2/2024 ची स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रा. पं. वगळुन)या करिता कामगारा़चे किमान वेतन निर्धारित करणारी अधिसुचना आणि मा. उपसचिव महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांचे उपरोक्त अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देणारे दि. 22/1/2016 चे परिपत्रकानुसार किमान वेतन लागू करने आणी कामगारांना सर्व सुविधा देणे. इत्यादी मागण्या करीता येथील नगर परिषदेत विविध विभागात कार्यरत कंत्राटी कामगार.दि 6/8/24 पासून नगर परिषद कार्यालयासमोर कामबंद आणि ठिय्या आंदोलन करीत आहेत . बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया द्वारा कामगारांच्या आंदोलनास समर्थन आणी न्याय मागण्या ...

*लॉर्ड बुध्दा टिवीचा वर्धापन दिन साजरा*l *-चुका आणि संकटांमुळे चॅनेलला नवी उर्जा, वक्त्यांचा सूर*

इमेज
*लॉर्ड बुध्दा टिवीचा वर्धापन दिन साजरा*l *-चुका आणि संकटांमुळे चॅनेलला नवी उर्जा, वक्त्यांचा सूर*  तालुका प्रतिनिधि,भद्रावती    भद्रावती- संकटं येतात अन् जातात. तशाच आयुष्यात चुका होतात. त्या शिकण्यासाठी असतात. त्या प्रत्येक विकासाची पायरी बनतात. लॉर्ड बुध्दा टी.व्ही.ने सुध्दा संकटांवर मात केली. चुकांपासून धडा घेतला. त्यामुळे एक तपाच्या प्रवासानंतर तावून सुलाखून बाहेर पडली. आता नव्या जोमानं छाप सोडत जाईल , या शब्दात लॉर्ड बुध्दा टी.व्ही.ला मान्यवरांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्या दिल्या. तेराव्या वर्धापन दिनानिमित्त इमामवाडा येथील हॉटेल ओरिएंट तायबा मध्ये स्नेहमिलन कार्यक्रम पार पडला. तेव्हा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्मल समुहाचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अँडवान्स हेल्थचे डॉ. रवि वैरागडे, सकाळ, विदर्भ आवृत्तीचे माजी संपादक भूपेंद्र गणवीर, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे, डॉ शंकर चौधरी, संगितकार मिलिंद जाधव, भैय्याजी खैरकर आदी मंचावर होते. अध्यक्षीय भाषणात प्रमोद मानमोडे म्हणाले, संकट येतात. तुमची प्रगती बघवत नाही.अशी ईर्षालू माणसं ती आणतात. त्...

भद्रावती येथील इसम बेपत्ता, आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

इमेज
भद्रावती येथील इसम बेपत्ता, आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन भद्रावती: लुंबिनी नगर सूर्य मंदिर वार्ड भद्रावती येथील माणिक चरणदास रामटेके हे भद्रावती स्थित आपल्या घरून बेपत्ता झाले आहेत. त्यांचा वर्ण सावळा, उंची पाच फूट सात इंच, पोशाख बारीक चौकटीचा शर्ट, काळी पॅन्ट असा पेहराव आहे. ही व्यक्ती कुणास आढळल्यास 73 50 54 97 33/75 17 39 63 26/95 95 57 85 61/86 68 82 59 65/97 30 31 15 67 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*खा. बाळूभाऊ धानोरकरांचे राजकिय गुरु खा. विनायकजी राऊत धानोरकरांच्या अंतिम दर्शनाला राहणार उपस्थित*

इमेज
भद्रावती : महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार तथा शिवसेनेचे पूर्वाश्रमीचे माजी आमदार बाळूभाऊ धानोरकर यांचे आज (दि. ३०) ला पहाटे २ च्या सुमारास  निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (दि. ३१) ला अंतिम संस्कार होणार आहेत. या अंतिम संस्काराला खासदार बाळूभाऊ धानोरकरांचे राजकिय गुरु शिवसेना नेते खासदार मान. श्री. विनायकजी राऊत साहेब व माजी विधानपरिषद सदस्य मान. दुष्यंतजी चतुर्वेदी तथा  पूर्व विदर्भ शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे अन्य पदाधिकारी वरोरा येथे सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहणार आहेत. खासदार बाळूभाऊ धानोरकर हे शिवसेनेत होते त्यावेळेस पासून शिवसेना नेते मान. विनायकजी राऊत यांचेसह त्यांचे घनिष्ठ ऋणानुबंध होते. बाळूभाऊ धानोरकर यांची जळणघळण ही प्रामुख्याने शिवसेनेतूनच झाली. या घटनेचे त्यांना अतीव दुःख झाले आहे. अशा कठीण प्रसंगी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेवून पक्षातर्फे श्रध्दांजली अर्पण करण्याकरीता व त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी शिवसेना नेते मान. विनायकजी राऊत उपास्थित राहतील. राऊत साहेब यांचे सकाळी मुंबईवरुन विमानाने ड...

निधन वार्ता,, बाजार समिती सभापती भास्कर ताजने यांना पित्रृ शोक - लटारीजी ताजने कालवश

इमेज
  भद्रावती: भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने यांचे वडील लटरी ताजने यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने दुखद निधन झाले.       त्यांची अंतयात्रा त्यांच्या राहते गावी (तिरवंजा) येथे वेळ 3 वाजता होणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.       त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो. दरारा ट्वेंटी फोर तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली”

भद्रावतीत आयु.राजरत्न आंबेडकर यांचा भव्य सत्कार !

इमेज
भद्रावती - दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष आद.राजरत्न आंबेडकर यांचा पेट्रोल पंप भद्रावती येथे चंद्रपुर चे जिल्हा अध्यक्ष कैलास ढेंगळे,आनंद वनकर, अविनाश  मेश्राम यांच्या उपस्थितीत  बौद्ध उपासक-उपासिका यांच्या तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून सत्कार करण्यात आले.          बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चा प्रसार व प्रचार व्हावा या करिता दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे भद्रावती तालुका अध्यक्ष मनोज मोडक तर्फे आयु. राजरत्न आंबेडकर यांना धनादेश देण्यात आला.       तसेच बौद्ध उपासिका,प्रेमिला देवगडे,वंदना देवगडे,ज्योती देवगडे, प्रणाली नागदेवते, शारदा खोब्रागडे,ललिता दुर्योधन,रेखा रंगारी, सुवर्णा कोल्हटकर, संगिता मोडक,माया रंगारी,मेश्राम ताई यांनी वेळेवर धम्म दान गोळा करून आयु.राजरत्न आंबेडकर यांना धम्म दान करून मदत केली.          सदर स्वागत कार्यक्रम दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भद्रावती ता.अध्यक्ष मनोज मोडक यांच्या सह राजरत्न पेटकर,सुरज कांबळे, वैभव जुलमे,स्वप्नि...