महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.19:- 75-वरोरा भद्रावती विधानसभा आगामी महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असतांना वरोरा विधानसभेतील शिवसेना पदाधिकारी यांना संघटनात्मक महत्वपूर्ण मार्गदर्शक सूचना देण्याकरीता वरोरा विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरीता चंद्रपूर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पक्षप्रमुख यांचे कडुन वेळोवेळी येणारे आदेशाचे पालन करुन निवडणुकीला समोरे जायचे आहे अश्या सुचना पदअधिकारी यांना देण्यात आल्या.
सभेला चंद्रपूर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख रोहन कुटेमाटे, महिला जिल्हा संघटीका नर्मदाताई बोरेकर, वरोरा तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकार, भद्रावती तालुकाप्रमुख नरेद्र पढाल,भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, युवती जिल्हा अधिकारी, प्रतिभा मांडवकर, भद्रावती महिला तालुका संघटीका आशाताई ताजणे, वरोरा तालुका महिला संघटीका, सरला मालोकर, विधानसभा युवाधिकारी अभिजीत कुडे, इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments