*हम लढेंगे - हम जितेंगे* गावागावात निर्धार॥
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात संतोषसिंह रावत यांचा डंका
*चंद्रपूर | दरारा २४ तास
राज्यात विधानसभा निवडणूकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यामुळे अनेक संभाव्य उमेदवारांनी गेल्या अनेक दिवसापासून मोर्चेबांधणी करीत आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल बघितलं तर बल्लारपूर विधानसभेत कांग्रेस पक्षाचे पारडं जड आहे. याच धर्तीवर कांग्रेस चे नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी बल्लारपूर विधानसभेत अनेक मुद्यांना घेऊन रस्त्यावरील आंदोलन करुन जनसामान्य नागरिकांना न्याय मिळावा म्हणून सतत भुमिका घेत आहेत. त्यामुळे विधानसभा मतदार संघात सध्यातरी कांग्रेस चे संतोष सिंह रावत यांचा गावागावात डंका आहे. गावागावात संतोष सिंह रावत यांच्या विजयासाठी नागरिकांनी कंबर कसली असून आता निर्धार करीत आहेत की "हम लढेंगे हम जितेंगे" त्यामुळे विरोधकांचै धाबे दणाणले आहेत.
संतोष सिंह रावत म्हणजे दलीत, शोषित,पिडीत व मागासवर्गीय यांच्या मदतीला धाऊन जाणारे नेतृत्व मानले जाते. त्यामुळे त्यांची बल्लारपूर विधानसभा मतदार संघात मोठी ओळख व कार्यकर्ते यांची फौज आहे. संतोष सिंह रावत हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांची नाळ बल्लारपूर विधानसभा मतदार संघात जनतेशी जुळलेली होती. आता ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत. बँकेच्या माध्यमातून या मतदार संघात महिला बचत गटाच्या अनेक प्रभावी योजना राबवून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे काम केले. याचबरोबर त्यांनी बेरोजगार व लहान व्यवसायी लोकांना स्माल कर्ज योजना देऊन व्यवसाय वाढविण्यासाठी हातभार लावला. शेतकरी वर्गांना सुद्धा अनेक प्रभावी योजना राबवून शेतकऱ्यांना सहकार्य केले. त्यामुळे जनतेशी नाळ जोडलेली आहे.
*लढेंगे और जितेंगे - संतोषसिंह रावत*
बल्लारपूर मतदार संघातील मतदारांचे प्रेम माझ्यावर आहे. पक्षाकडून उमेदवारी लवकर घोषित केला तर इतल्या भाजपाच्या मुरब्बी राजकारण्याचा अस्त करुन जनतेची सेवा करु. येथील बेरोजगार, महिला, शेतकरी हक्कासाठी सभागृहात प्रश्न मार्गी लाऊन जनतेची सेवा करु.
0 Comments