महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या तालुका अध्यक्षपदी शरद राजुरकर
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
दरारा 24 तास न्युज नेटवर्क
भद्रावती,दि.१७:-येथील लोकमान्य विद्यालयातील गणित शिक्षक शरद राजुरकर यांची महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या भद्रावती तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन सरपटवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी उपप्राचार्य रुपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे आणि इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते. राजुरकर यांचे लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, सचिव नामदेवराव कोल्हे, सहसचिव अमित गुंडावार, शाळा समितीचे अध्यक्ष उल्हास भास्करवार, संचालक मनोहरराव पारधे, गोपालराव ठेंगणे, उमाकांत गुंडावार, अविनाश पाम्पट्टीवार, संजय पारधे यांनी अभिनंदन केले आहे.
इतर कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष हरिश्चंद्र हरणे, सचिव कवीश्वर शेंडे, सहसचिव नितेश मिलमिले, कोषाध्यक्ष संजय जेऊरकर, प्रसिद्धी प्रमुख उमेश पाटील, सदस्य दयाकर मग्गीडवार, किरण उपासे, हरीहर येलकर, सुरेश सूर, अनिल कार्लेकर यांचा समावेश आहे.
0 Comments