भद्रावतीत आयु.राजरत्न आंबेडकर यांचा भव्य सत्कार !




भद्रावती-
दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष आद.राजरत्न आंबेडकर यांचा पेट्रोल पंप भद्रावती येथे चंद्रपुर चे जिल्हा अध्यक्ष कैलास ढेंगळे,आनंद वनकर, अविनाश  मेश्राम यांच्या उपस्थितीत  बौद्ध उपासक-उपासिका यांच्या तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून सत्कार करण्यात आले.
         बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चा प्रसार व प्रचार व्हावा या करिता दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे भद्रावती तालुका अध्यक्ष मनोज मोडक तर्फे आयु. राजरत्न आंबेडकर यांना धनादेश देण्यात आला.
      तसेच बौद्ध उपासिका,प्रेमिला देवगडे,वंदना देवगडे,ज्योती देवगडे, प्रणाली नागदेवते, शारदा खोब्रागडे,ललिता दुर्योधन,रेखा रंगारी, सुवर्णा कोल्हटकर, संगिता मोडक,माया रंगारी,मेश्राम ताई यांनी वेळेवर धम्म दान गोळा करून आयु.राजरत्न आंबेडकर यांना धम्म दान करून मदत केली.
         सदर स्वागत कार्यक्रम दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भद्रावती ता.अध्यक्ष मनोज मोडक यांच्या सह राजरत्न पेटकर,सुरज कांबळे, वैभव जुलमे,स्वप्निल बनकर,सोनू सिंग.अमन फुलझेले,सुमेध खोब्रागडे,थामस दुधे, समता सैनिक दलाचे मार्शल कमलाकर काटकर,मार्शल  हर्षल वावरे,शंकरजी परेकर,रामटेके सर,जवादे सर,मुनेश्वर गौरकार, राजहंस मेश्राम,सुरदास खोब्रागडे महिला कार्यकर्ते प्रेमिला देवगडे,वंदना देवगडे,ललिता दुर्योधन,रेखा रंगारी, सुवर्णा कोल्हटकर, संगिता मोडक, माया रंगारी, मेश्राम ताई यांनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केला.
      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्या बद्दल मनोज मोडक यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू