Ticker

6/recent/ticker-posts

पवन भगत यांच्या "ते पन्नास दिवस"या कादंबरी ला ऑर्थर ऑफ दि ईयर पुरस्कार

पवन भगत यांच्या "ते पन्नास दिवस"या कादंबरी ला ऑर्थर ऑफ दि ईयर पुरस्कार
-----------------------------
 बहुचर्चित कादंबरी "ते पन्नास दिवस"..या पुस्तकाचे लेखक पवन भगत यांना या वर्षी चा इंडियन पब्लिशर फेडरेशन च्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार जाहीर झाला आहे. पन्नास हजार रोख आणि सन्मान पत्र या पुरस्काराचे स्वरूप असून. महामारी च्या काळात अचानक पणे लादण्यात आलेल्या टाळेबंदी च्या निर्णयाने स्थानांतरित मजुरांची ससेहोलपट भूक उपसमारीचा सामना करीत केलेला पंधराशे किलोमीटर चा पायदळ प्रवास या कादंबरीत विशद करण्यात आला आहे.
कोरोना काळातील माणूस पण हरवलेल्या समाजाचे चित्र महामारी ला अवसर म्हणून केलेल्या काळाबाजारी,भेदभाव, सावकारी, कर्जबाजारी, रस्त्यावरील मजुरांचा मृत्यू, रेल्वे रुळावरील स्थानांतरित मजुरांची प्रेते,पायदळी चालणाऱ्या मजुरांचे शोषण,पोलिसी अत्याचार, बहिष्कृत जगणे ,रस्त्यावरील होत असलेल्या प्रसूती, महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या, कोरोना चे सांप्रदायिकरण,निसर्ग निर्मित महामारी च्या दहशतीचे अमानवीय स्वरूप, रस्त्यावरील चालणाऱ्या मजुरांचे भुके समोर जात,धर्म,पंथाच्या उभ्या असलेल्या इमारती कोसळल्या,केवळ मजूर म्हणून जंगलातील पाने फुले खाऊन एकमेकांना सांभाळत केलेला पंधराशे किलोमीटर चा पायदळ प्रवास ..या कादंबरीत मांडण्यात आला असल्याने साहित्य वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे..
    अमेझॉन वर या कादंबरी ला चांगली मागणी असल्याने,या वर्षीच्या "ऑथर ऑफ दि यिअर" या पुरस्काराने कलकत्ता येथे देश विदेशातील साहित्यिक, पब्लिशर च्या पुढे हा पुरस्कार देण्यात येत आहे..
लेखक पवन भगत यांचे सिद्धार्थ वाघमारे,अशोक निमगडे सर, सुरेश नारनवरे जितेंद्र डोहणे तसेच अनेक साहित्य संस्थेने अभिनंदन केले..

Post a Comment

0 Comments