अखेर तो नरभक्षक वाघ जेरबंद-
पाहाणीॅ येथील गावकऱ्यांच्या तक्रारीची वनविभागांनी घेतली दखल
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
नागभीड ---तालुक्यातील ढोरपा, पाहर्णी,पान्होडी या गावातील दीड महिन्यात चार जणांचा बळी घेणारा वाघ आज दिनांक 3 डिसेंबर 2022 ला दुपारी अखेर जेरबंद झाला.वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करून त्या वाघाला बेशुद्ध करून पकडले.
तालुक्यात सतत वाघाचे हल्ले सुरू आहेत.शनिवारी वाघाने शेतावर गेलेल्या पाहर्णी येथील एका महिलेचा बळी घेतला होता. या परिसरात या दीड महिन्यातील वाघाच्या हल्ल्याचे चार घटना घडल्या. वनिता वासुदेव कुंभरे (पाहर्णी )ही महिला 26/11/2022शनिवारी शेतात गवत आणण्यासाठी गेली असता तिच्या हल्ला करून ठार केले होते. त्यानंतर ढोरपा जवळ असलेल्या टेकरी या शिवारात वाघाच्या हल्यात महिला ठार झाली होती. तर याच आठवड्यात ढोरपा येथील महिलेवर प्राणघातक हल्ला केला होता. त्या अगोदर पान्होडी येथील गुराख्यास वाघाने ठार केले होते. त्यामुळे ढोरपा, पाहर्णी, पान्होडी या परिसरात वाघाची चांगली दहशत पसरली होती.आज वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन करून त्या नरभक्षक वाघाला बे शुद्ध करून जेरबंद केले.
या बाबत पाहाणीॅ येथील माजी सरपंच मोरेश्वर बावनकर, नरेंद्र मसराम,राजेश नान्हे,किशोर निरगुडे,रामराज पंचभाई,इतर शेतकरी बांधवानी वनविभाग चे अधिकारी सुनील हजारे,तहसिलदार मनोहर चव्हाण,एस,डी,ऒ, ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरी तसेच जिल्हा अधिकारी चंद्रपुर यांना दिनांक 1/12/2022 ला निवेदन देण्यात आले होते, निवेदनाची दखल घेवून वरिल कार्यवाई करण्यात आली, सविस्तर वृत्त मिळेपर्यंत पुन्हा तेथे वाघ असल्यामुळे त्या वाघांचा वन विभाग शोध करीत होते.
0 टिप्पण्या
Thanks for reading