सावली:- येथील वार्ड क्रमांक 9 चे रहिवाशी तथा प्रादेशिक दैनिकाचे पत्रकार सूरज बोम्मावार यांची दुचाकी वाहन दिनांक 2 डिसेंबर ला सायंकाळी सात ते साडे सातच्या सुमारास त्यांच्या घरासमोरून चोरट्याने पळविल्याने एकच खळबळ माजली असून भरवस्ती मध्ये चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सूरज बोम्मावार हे आपल्या हिरो कंपनी ची स्प्लेनडर प्लस गाडी क्रमांक Mh 34 BX0401 ने आपले कामे आटोपून सायंकाळी 7 च्या जवळपास घरी आले.त्यांनतर साडेसात च्या दरम्यान घरासमोरून चोरट्याने चोरून नेली.भर वस्तीमधून गाडी चोरी होणे हे धक्कादायक असून पोलीस प्रशासनाला हा एक चोरट्याने चॅलेंज केला सारखा प्रकार आहे. या घटनेने सावलीत खळबळ माजली असून घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली.पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपास सुरू आहे.मात्र सध्या जिल्ह्यात वाहन चोरी चा प्रकार हा वाढत असल्याचे दिसून येत आहे.
अनेक जण आपली गाडी हे आपल्या घराबाहेर ठेवतात मात्र सुरक्षित राहत नाही त्यामुळे गाडी चोरी करणारी टोळी सावली व तालुक्यात आलेली आहे असे या घटनेवरून दिसत असून सर्वांनी सतर्कता बाळगावे व कुणावर संशय असल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी असे पोलीस विभागाने कळविले आहे.
0 Comments