अहेतेशाम अली यांची देवालय सोसायटी येथील शारदा महिला मंडळाला भेट
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.११:-शहरातील विंजासन रोड भद्रावती देवालय सोसायटीला नुकतेच 4 वर्ष झाले असून पुरुष मंडळी दरवर्षी गणेश उत्सव साजरा करत असतात.या दरम्यान महिलांनी सुद्धा पुढाकार घेऊन या वर्षीपासून शारदा उत्सवाला सुरवात केली. या निमित्याने माजी नगराध्यक्ष नगर परिषद,वरोरा तथा वरोरा भद्रावती विधानसभा नेता मा. श्री.अहेतेशाम अली यांची सोसायटी वासीयांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थिती दर्शविली सोसायटीच्या वतीने स्वागत करण्यात आले.तसेच त्यांच्यासह श्री.धर्मेंद्र हवेलीकर, श्री.रविद्र पवार मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सखोल विविध विषयांवर समस्येवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी सोसायटी मधील देवालय शारदा महिला मंडळाच्या पदाधिकारी सौ.निलेशा बिस्वास, सौ.हर्षदा चटपल्लीवार,सौ.प्रियंका राजूरकर, सौ. रेश्मा मेंघरे, सौ. रेखा सुंकुरवार, सौ.हिना चंदनकर, सौ.सिमा मुळे, सौ.पल्लवी शर्मा,सौ. सोनाली सुकारे, सौ. किरण राऊत,सौ.समृद्धी खैरकर, तसेच पुरुषांमध्ये हंसराज नागपुरे, अंजय्या पुल्लुरवार, शाम चटपल्लीवार, प्राणतोष बिस्वास, सूर्यकांत राजूरकर, सुनील सुंकुरवार,हरीश शर्मा, रतन सुकारे आदी उपस्थिती होती.
0 Comments