*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे -युवासेना आढावा बैठक संपन्न*
*अनेक युवकांचा युवासेनेत प्रवेश*
दरारा 24 तास न्युज नेटवर्क
धर्मपाल कांबळे जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर: युवासेना प्रमुख श्री आदित्य साहेब ठाकरे, शिवसेना -युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या आदेशाने तसेच कार्यकारणी सदस्य हर्षलजी काकडे साहेब, पूर्व विदर्भ विभागीय सचिव सिनेट सदस्य श्री निलेश भाऊ बेलखेडे व चंद्रपूर युवासेना विस्तारक श्री संदीप रियाल (पटेल) यांच्या मार्गदर्शनात तसेच चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख श्री विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी आढावा बैठक जेष्ठ नागरी संघ सभागृह येथे पार पडली.
चंद्रपूर , बल्लारपूर , राजुरा या तिन्ही विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दल विचार करता सर्व पदाधिकारी कडून त्त्यांच्या विधानसभेचा आढावा घेण्यात आला तसेच यावेळी विधानसभेत आपला भगवा फडकवायचा असून त्यासाठी सर्व पदाधिकारी, युवासैनिक व शिवसैनिक जोमाने काम करून आपले कर्तव्य पार पाडावे व मशाल घरोघरी पोहोचवावी. शिक्षण, आरोग्य व रोजगार या बद्दल त्रिसूत्री कार्यक्रम राबवून युवक युवतीना सहकार्य करून युवासेना चं कार्य करावे अशी सूचना यावेळी विभागीय सचिव सिनेट सदस्य इंजि.निलेश बेलखेडे यांनी केली.
जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी यांच्या कामाबद्दल विस्तारक संदीप रियाल पटेल यांनी समाधान व्यक्त करीत यापुढे संघटनात्मक बांधणी वर विशेष लक्ष दिल्या जाऊन पदाधिकारी यांनी चांगल कार्य करून युवासेना च्या माध्यमातून घर तिथे युवासैनिक राबवून पक्षाचे विचार घरोघरी पोहोचवा असे मार्गदर्शन केले. युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांनी जिल्ह्यातील विधानसभा पदाधिकारी यांचा परिचय करून देत आजवरच्या कार्याचा आढावा वरिष्ठ पदाधिकारी यांच्या समोर ठेवला व युवा सेनेच्या माध्यमातून यापुढे चांगल कार्य जिल्ह्यात केल्या जाणार याबद्दलचा विश्वास पदाधिकारी यांना दिला.
यानंतर वरिष्ट पदाधिकारी यांनी युवासैनिकांसोबत चर्चा करीत त्त्यांचे मनोगत ऐकून त्त्यांचे मनोबल वाढवण्यात आले.
यावेळी युवासेना मध्ये चंद्रपुर जिल्यातील अनेक युवकांनी प्रवेश घेतला.
यावेळी उपस्थित पदाधिकारी
जिल्हा चिटणीस सुमितभाऊ अग्रवाल,चंद्रपूर विधानसभा येथील उपजिल्हा प्रमुख बंटी कमटम , तालुका प्रमुख सूरज शेंडे शहर प्रमुख शहबाज शेख , वैभव काळे ,शहर समन्वयक प्रज्वल आवडे ,उपतालुका प्रमुख विवान रामटेके , उपशहर प्रमुख संघदीप रामटेके , उपशहर प्रमुख सार्थक शिर्के,बल्लारपूर विधानसभा येथील तालुका प्रमुख नीरज यादव , शहर प्रमुख अनिकेत बेलखोडे , शहर प्रमुख पोंभुर्णा महेश श्रीगिरवार , शहर प्रमुख मूल अमित अलियानी तालुका प्रमुख मूल रितिक संगमवार , राजुरा विधानसभा येथील उपजिल्हा प्रमुख राजुरा कुणाल कुडे , तालुका प्रमुख राजुरा अमित मालेकर ,शहर प्रमुख राजुरा स्वप्नील मोहुर्ले ,शहर प्रमुख विवेक राणा गोंडपिपरी , वतन मदार यांच्या सह युवा सैनीकांची प्रामुख्यानी उपस्थिती होती.
0 Comments