देवी विसर्जनासाठी गेलेला ग्रामपंचायत सदस्य नहरात बुडाला-
चंद्रपूर जिल्हा, मुल तालुक्यातील घटना-शोध मोहीम सुरू
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
विजय जाधव, तालुका प्रतिनिधी
मुल: तालुक्यातील चक दुगाळा येथील ग्रामपंचायत सदस्य व युवा शेतकरी दिलीप सातपुते वय 42 यांचा दुर्गा देवी विसर्जन दरम्यान पाण्यात बुडून लापता झाल्याची घटना आज 13 रोजी रविवारला सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास घडली आहे.
त्यामुळे गावात सर्वत्र हळ हळ होत असून शोककळा पसरली आहे. पोलिस घटना स्थळी दाखल होत शोध कार्य सुरू केले असून पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बुडणाऱ्या व्यक्तीचा शोध वृत्त लीहिस्तोवर लागलेला नव्हता.
आज रविवारी ता. 13/10 लां सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास दुगाळा येथील महिला व पुरुष यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दुर्गा देवीचे मोठ्या थाटामाटात, वाजत- गाजत मिरवणूक काढत गावा शेजारी वाहत जाणाऱ्या गोशीखुर्द नहरात विसर्जन करण्यासाठी देवीला घेऊन गेले असता सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास कालव्यातील पाण्याचे प्रवाह जोराने असल्याने दुगाळा येथील ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी दिलीप सातपुते हे पाण्यासोबत वाहून गेले असल्याची घटना घडली आहे.
या आकस्मिक व दुर्दैवी घटनेमुळे गाव व परिसरात सर्वत्र हळहळ होत आहे. बघ्यांची मोठी गर्दी घटना स्थळी झाली असून पोलिस चौकी बेंबाळ कडून शोध कार्य सुरू आहे.
त्यांच्या पश्चात मुलगी, मुलगा, पत्नी, आई, वडील असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading