विजय जाधव प्रतिनिधी
===========================
https://youtu.be/G7icGw9FvbY
मुल: गोंडपिपरी ते खेडी या मार्गाचे रखडलेले काम त्वरित करावे या प्रमुख मागणीला घेऊन घोसरी फाट्यावर चक्काजाम आंदोलन सुरू आहे.ठरल्याप्रमाणे नियोजित वेळेत खेडी गोंडपिंपरी रोडचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्यात यावे ,तसेच झालेल्या कामातील अपव्यवहार, भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, सदर मार्गावर ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आलेले खड्डे त्वरित बुजवण्यात यावे, सीडीवर्कची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यात यावा, सदर मार्गावर अपघातात यांचे जीव गेले त्यांना तात्काळ कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, चार वर्षापासून रेंगाळत असलेले काम पूर्ण करण्यात यावे इत्यादी प्रमुख मागण्या घेऊन मुल तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने आज दिनांक 16 मे 2023 रोजी ठरलेल्या वेळेत चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले असून सदर आंदोलनाचा वनवा या मार्गावर भडकल्याने चांदापूर फाट्यावर सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम केले आहे .यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली असून चांदापूर पासून गोंडपिपरी कडे जाणारी वाहने तसेच गोंडपिपरी, पोभूणर्णा मुल ला जाणाऱ्या बसेस घोसरी फाट्यावर थांबलेल्या आहेत. यात प्रवाशांची कोंडी झालेली आहे.
संबंधित विभागाने आंदोलन कर्त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन सदर मार्गावरील मार्गक्रमण सुरू करावा अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केलेली आहे.
या मार्गाच्या वृत्तपत्रात व इतर माध्यमातून अनेकदा बातम्या झडकल्या मात्र प्रशासनाने व ठेकेदाराने याकडे अत्यंत दुर्लक्ष केल्यामुळे काँग्रेस पक्षाला हे आंदोलन उभे करावे लागले.
आंदोलनात नांदगावच्या सरपंच हिमानी ताई वाकुडकर, मुल पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, काँग्रेस नेते दीपक वाढई, युवक काँग्रेस नेते पवन नीलमवार, प्रकाश आंबटकर व कार्यकर्ते उपस्थित आहेत.
https://youtu.be/G7icGw9FvbY
0 Comments