Ticker

6/recent/ticker-posts

पोंभुर्णा तालुक्यातील मोहाळा येथील शेतकरी आठ दिवसापासून बेपत्ता, माहिती कळविण्याचे आवाहन




पोभुर्णा :  तालुक्यातील मोहाळा येथील एक प्रतिष्ठित शेतकरी गेल्याआठ दिवसांपासून  बेपत्ता असल्याने त्यांच्या कुटुंबीयांत चिंतेचा सावट पसरले असल्याची बाब समोर आली आहे. देवराव गनपती वांढरे वय 44 असे बेपत्ता असलेल्या शेतकरी इसमाचे नाव आहे.
      प्राप्त माहितीनुसार दिनांक 9/5/2023 ला रात्री 4 वाजताचे सुमारास पहाटे सदर शेतकरी झोपतुन उठून घराबाहेर पडला. तेव्हापासून बेपत्ता झाल्याने सदर इसम हा कुठे आहे?कोणत्या ठिकाणी गेला, याची माहिती अजुनपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली नाही. संबंधित व्यक्ती बेपत्ता झाल्याने त्यांच्या घरच्या मंडळींकडून, नातेवाईक, मित्र परिवार यांच्या कडे शोधाशोध केली मात्र त्यांचा कुठेही थांब पता लागला नाही. शेवटी पोंभुर्णा पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंदवण्यात आली. पोलीस बेपत्ता झालेल्या इसमाचा शोध घेत आहेत. परंतु आजतागायत त्याचा कुठेही शोध लागला नाही.
      बेपत्ता झालेल्या ईसमाचे वर्णन-चेहरा गोरा, उंची साडेपाच फूट, बांधा सडपातळ,दाडी वाढलेली आहे.असा इसम कुणालाही आढळून आल्यास गनपती हरीचंद्र वांढरे (वडिल) मोबाईल नंबर 9049200471 तसेच भाऊराव गनपती वांढरे ( भाऊ) मोबाईल नंबर 9325463895 ,7666186573 ह्या नंबशी संपर्क करण्यात यावा किंवा पोभुर्णा पोलीस स्टेशन येथे कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments