बलिया (उत्तर प्रदेश)
उत्तर प्रदेशातील बलिया मध्ये एक मोठा अपघात झाला आहे. मुंडन संस्कार करण्यासाठी गंगा नदी मलदीपूर घाटावर काही नागरिक गेले होते.
दरम्यान 40 जण नावेवर बसले होते नाव ओव्हरलोड झाल्याने पाण्यात बुडाली. या अपघातात आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अन्य प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. वीस ते पंचवीस प्रवासी बेपत्ता असल्याची शंका उपस्थित केली जात असून घटनास्थळावर सतत मदत व बचाव कार्य जारी आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading