काँग्रेस नेते व सी डी सी सी बँकेचे जिल्हाध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे प्रतिपादन
विजय जाधव, नांदगाव
ग्रामीण भागात खेळले जाणारे क्रिकेट ग्रामीण भागातील सर्वसामान्य खेळाडूंची प्रतिभा उंचावण्याचे कार्य करते,
कला, क्रीडा,व साहित्य आणि संस्कृती जोपासण्याकरिता ग्रामीण भागाचा मोलाचा वाटा आहे. असे प्रतिपादन काँग्रेस नेते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंहरावत यांनी केले. ते नांदगाव येथे रात्र कालीन भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. थ्री स्टार क्रिकेट मंडळ नांदगाव च्या वतीने सदर सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ भाऊ वाकुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून हे क्रीडा सत्र रात्र कालीन सुरू झाले आहे. याप्रसंगी संतोषसिंहरावत यांनी या सामन्यांच्या आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य आणि मदत करण्याचे आश्वासन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काँग्रेस नेते संतोष सिंह रावत यांनी मंचावरून आपले विचार व्यक्त करताना केले. या सामन्यांचे उद्घाटन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी केले. राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय सुभाष भाऊ धोटे हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माननीय संतोष भाऊ रावत हे उपस्थित होते. सर्व क्रीडाप्रेमींना तसेच गावकऱ्यांना कला, क्रीडा आणि साहित्य, संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. आणि गाव विकासाकरिता सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मंचावर उपस्थित असलेल्या गावच्या सरपंच हिमानीताई वाकुडकर यांना आश्वासन दिले. सदर गावाकरिता ग्राम विकासात मी कुठेही कमी पडणार नाही. विरोधकांचा आरोप झुगारून सर्वतोपरी विकास कार्यात मदत करण्याचे आणि सहकार्य करण्याचे आश्वासन माननीय संतोष भाऊ रावत यांनी आपल्या भाषणातून दिले. यावेळी क्रीडा मंडळाचे आयोजक अभिजीत दशरथ वाकुडकर, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मुल, नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष संजय गांधी निराधार योजनेचे मूल तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष माननीय राकेश भाऊ रत्नावार, तालुक्यातील काँग्रेस नेते, देवाळा खुर्द चे सरपंच विलास भाऊ मोगरकrर,काँग्रेस पोंभुर्णा तालुका अध्यक्ष रविभाऊ मारपलीवार, उपसरपंच जितु भाऊ चुधरी हे उपस्थित होते. याप्रसंगी मंचावर सावलीचे माजी सभापती विजय भाऊ कोरेवार, हिरापूरचे सरपंच नितीन भाऊ गव्हाणे, नांदगाव चे ग्रामपंचायत सदस्य त्रिमूर्ती नाहगमकर, तसेच इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नांदगावच्या सरपंच कुमारी हिमानीताई वाकुडकर यांनी आपल्या भाषणातून कला, क्रीडा, साहित्य, आणि संस्कृती याबाबत आपल्या प्रास्ताविक भाषणातून सविस्तर माहिती देऊन ग्रामविकासाकरिता सहकार्य करण्याचे आवाहन मंचावर उपस्थित आमदार महोदय तसेच संतोष भाऊ रावत यांना विनंती केलेली आहे. या कार्यक्रमाप्रसंगी असंख्य क्रीडा प्रेमी आणि गावकरी मंडळी उपस्थित होते. सदर कार्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी क्रीडा मंडळ सक्षम असून रात्र कालीन सामने भव्य दिव्य प्रकाशात सुरू आहेत. याबाबत ग्रामीण भागात दुसऱ्यांदा रात्र कालीन सामने बघायला मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे. अशाच प्रकारचे सामने भविष्यात होत राहावे आणि गावकऱ्यांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ वाकुडकर यांनी केली आहे.
0 Comments