मूल प्रतिनिधी
मूल तालुक्यातील चिचाळा येथील एका शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. मॄत शेतकऱ्याचे नाव भैय्याजी वारलू मोहुर्ले असे आहे. त्याचे वय 55 वर्ष होते. चिचाळा शेतशिवार परिसरात त्याची एक एकर धानाची शेती आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार सतीश सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची जन्म करीत आहे.
0 Comments