चंद्रपूर (रंजन मिश्रा)
जिल्ह्यातील प्राथमिक मुख्याध्यापकांच्या रिक्त पदांवर पदोन्नतीने पदस्थापना करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पत्र काढले असून यामध्ये 66 रिक्त पदांसाठी 58 शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली असून त्यांना उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे. मात्र या यादीमध्ये चक्क सेवानिवृत्त शिक्षकांची नावे असल्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे अनेक ज्येष्ठांना डावलून कनिष्ठ शिक्षकांची नावे असल्याचा आरोपही केला जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 66 शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पद रिक्त आहे. या रिक्त पदांवर पदोन्नतीने मुख्याध्यापकांची पदस्थापना करण्यात येणार आहे. यासंदर्भात 28 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता येथील सभागृहामध्ये समुपदेशन ठेवण्यात आलेले आहे. यासाठी पदोन्नती समितीने मान्यता दिलेल्या 58 शिक्षकांचा समावेश आहे. मात्र या शिक्षकांमध्ये काही शिक्षक सेवानिवृत्त झाले असून त्यांची ही नावे पदोन्नती स्थापना करणाऱ्या मुख्याध्यापकांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.नव्याने प्रकाशित करून जेवढ्या जागा रिक्त आहेत त्यानुसार शिक्षकांची तसेच ज्येष्ठतेनुसार शिक्षकांची पदोन्नती करावी अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.
_________________
66 जागा रिक्त
जिल्ह्यात सध्या स्थितीत 66 जागा रिक्त आहेत या रस्त्या जागांवर मुक्ताचापकांची नेमणूक करणे अत्यावश्यक आहे असे असतानाही शिक्षण विभागाने केवळ 58 शिक्षकांचीच यादी प्रकाशित केल्याने उर्वरित शाळांचे भविष्य काय असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
_________________
शिक्षकांमध्ये खळबळ
सध्या शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे बहुतांश शिक्षक आपापल्या गावी गेलेली आहे. दरम्यान शिक्षण विभागाने गुरुवारी सायंकाळी पदोन्नतीने मुख्याध्यापकांचे पदस्थापना करण्याची यादी प्रकाशित करून त्यांना शुक्रवारी दुपारी चार वाजता उपस्थित राहण्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांचा गोंधळ उडाला असून या शिक्षकांना आपापल्या गावावरून तात्काळ यावे लागणार आहे.
_________________
विजय भोगेकर राज्य नेते महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघ यांची प्रतिक्रिया
जिल्ह्यातील मुख्याध्यापकांच्या रिक्त जागेवर पदोन्नतीने पदस्थापना केली जाणार आहे मात्र प्रकाशित यादीमध्ये अनेक सेवानिवृत्त मुख्याध्यापकांची नावे आहेत एवढेच नाही तर रिक्त पदे अधिक असताना काही शिक्षकांची पदोन्नती केली जाणार आहे. त्यामुळे नव्याने यादी प्रकाशित करून कोणावरही अन्याय होणार नाही, असे नियोजन करावे तसेच रिक्त जागांचाही विचार करणे आवश्यक आहे.
0 Comments