Ticker

6/recent/ticker-posts

आनंदाचा शिधा पोंभुर्णा तालुक्यात पोहोचलाच नाही!

 
पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी
       राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने दिवाळीनिमित्त सर्वसामान्य नागरिकांना शंभर रुपयात चार वस्तूंचा "आनंद शिधा" देण्याची योजना जाहीर केली, मात्र ही योजना पूर्ती फसवी ठरली असून सर्व सामान्यांना हा "आनंद शिधा" अजूनही मिळाला नाही. त्यामुळे सामान्यांची दिवाळी गोड होण्याऐवजी कडूच झालेली आहे.
      सर्व सामान्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने शंभर रुपयात एक किलो रवा' मैदा' चणाडाळ आणि एक किलो तेल देण्याची योजना शिंदे फडणवीस सरकारने जाहीर केली. मात्र दिवाळी संपूनही गेली तरीही हा "आनंद शिधा" तालुक्यात अनेक गावात पोहोचला नसल्याची ओरड होत आहे. याबाबतीत तहसील कार्यालयात जाऊन विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजी कसलीही शासकीय सुट्टी नसताना तहसील कचेरी कर्मचाऱ्यांना होती. पुरवठा विभागाला तर चक्क कुलूपच लागले होते.
     
 आनंदाचा शिधा योजनेतील किटमध्ये दिवाळीत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब अर्थात केशरी शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयांमध्ये दिवाळीचा शिधा मिळणार होता. परंतु तो अद्यापही मिळाला नाही. या योजनेविषयी रेशन दुकानदारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments