Ticker

6/recent/ticker-posts

कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड गडचांदूर येथे सोयाबीन खरेदीचा शुभारंभ !!



तालुका प्रतिनिधी,
 कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना अंतर्गत गडचांदूर उप बाजारपेठ मार्केट यार्ड वर शेतकरी उत्पादित सोयाबीन लिलावाद्वारे खुल्या बाजारपेठेत खरेदी सुरु झाली आहे. व त्यामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणला होता.शुभारंभ दिनी ४७३० रुपये भावाने खरेदी करण्यात आले व पहिल्या दिवशीच आवक हि चांगल्या प्रकारे होती. कृषी उत्पन्न बाजार समिती गडचांदूर चे सचिव .कवडू देरकर यांनी प्रथम बोली लिलावाद्वारे माल विक्री केलेल्या प्रथम शेतकरी .बापूराव गोरे यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनी व शिवमांगल्य शेतकरी उत्पादक कंपनी यांनी हि सोयाबीन खरेदी केली. व बाजार समितीने अडत व दलाली मुक्त शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सोयाबीनची खरेदीची सुरूवात केली.व शेतकऱ्यांना कोणतेही अडत नसल्याने RTGS द्वारे धान्य विक्रीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याने तसेच शेतकऱ्यांने स्वत: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काट्यावर माल तुलाई होत असल्याने कसल्याही प्रकारची शेतकऱ्याची लुट केल्या जात नसल्याचे मत शेतकऱ्याने व्यक्त केले.या प्रसंगी सय्यद आबिद अली,गणेश वाभिटकर,शंकर ठावरी,अझहर शेख, तसेचकृषी उत्पन्न बाजार समितीचे गोरे,राठोड,व सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनीचे CEO अंगद गुट्टे व इतर शेतकरी उपस्थीत होते. सचिव देरकर यांनी व्यापाऱ्याचे घरी थेट माल विक्रीन करता यार्डवरच विक्री करावा अडत पद्धती बंद असल्याने शेतकऱ्याची पिळवणुक होऊ नये या लिलावात भाग घेऊन ज्यादा भावाचा लाभ घ्यावा कोरपना व गडचांदूर यार्डवर बाजार समीती काटयाची व्यवस्था केल्याने व व्यापाऱ्याच्या काटयावर शेतकऱ्याची पिळवणुक होऊ नये यासाठी व्यवस्था केली आहे. तसेच पणन महामंडळ व कृषी उत्पण बाजार समीती सोयाबिज तारण योजना गडचांदूर येथे सुरू केली आहे. तारण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकऱ्याना केले आहे.

Post a Comment

0 Comments