Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी अनुदानापासून वंचित! शिधापत्रिकाधारकांना दिवाळी किट मिळालेच नाही, दिवाळी अंधारात,,,,,,, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सुहेल अली यांचा आरोप





 तालुका प्रतिनिधी 
शासनाने जुलै ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसाने नुकसानीचे पंचनामे करून दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादा सहा हजार आठशे ऐवजी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मदत देण्याची गोड घोषणा केली मात्र दिवाळी साजरी होईल हतबल झालेला शेतकरी मोठ्या आशेने दिवाळी साजरी करण्याचा बेत आखला प्रशासनाकडून गावनिहाय याद्या तयार करून प्रसिद्धी देण्यात आली.


 मात्र अनेक राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रकमात जमा झाली नसल्याने पावसाने पिकावर पाणी फिरवले तर शासनाने घोषणा करून दिवाळीच्या आनंदावर पाणी फिरवल्याचे चित्र या भागात असून अनेक शेतकऱ्यांच्या घरात दिवाळीच्या दिव्या ऐवजी अंधार दिसून आला महाराष्ट्र शासनाने ऑक्टोबर 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंतोदय लाभार्थी व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना आनंदा दिवाळी किट देण्याची घोषणा केली व 100 रुपयांमध्ये दिवाळीचा आनंद साजरा होईल अशी आशा शिधापत्रिका धारकांना होती मात्र कोरपणा तहसीलचे मुख्यालय असलेल्या शहरांमध्ये अंतोदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थींना शंभर रुपयाचे किट उपलब्ध झाले नसल्याने दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे.


 यामुळे शासनाची घोषणा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे व प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात धान्य किट वाटप करण्याची घोषणा करण्यात आली होती दिवाळीचा तिसरा दिवस साजरा होत असताना मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीचे अनुदान व अंतोदय लाभार्थ्यांच्या आनंद धान्य साखर तेल रवा किट उपलब्ध झाले नसल्याचे अनेकांना दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहावे लागले आहे कोरपणा या शहरांमध्ये अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने तातडीने कोरपणा व उर्वरित गावामध्ये धान्य किट पोहोचून सुद्धा वाटप का करण्यात आले नाही शासनाने पास मशीन ऐवजी ऑफलाइन वितरण करण्याचे सुद्धा निर्देश दिले असताना  सारख्या सणासाठी शासनाच्या लाभापासून शेतकरी व अंतोदय लाभार्थी वंचित असल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत असल्याचे राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोहेल अली यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान व अंतोदय प्राधान्य कुटुंबांना धान्य वितरण करण्याची मागणी केली आहे.


Post a Comment

0 Comments