मुंबई / चक्रधर मेश्राम
आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे. नुकताच राजापेठ पोलीस ठाण्यात महिलांनी बच्चू कडू यांच्या विरोधात तक्रार दिली आहे यात रवी राणा यांच्या आईवर अपशब्द वापरल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आमदार बच्चू कडू यांनी हा आरोप फेटाळून लावत रवी राणा यांना चांगलच सुनावलं… यावर बच्चू कडू म्हणाले, मी आमदार रवी राणांच्या आईवर मी काहीही बोललो नाही , राणानी हे घाणेरडे राजकारण करू नये राणा यांच्या आरोपाविरोधात 50 कोटी रुपयांचा दावा देखील ठोकणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे स्वतःला लपण्यासाठी आईला समोर करित असल्याचा आरोप देखील यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे… त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या वादात मध्यस्थी करणार आहेत का हे पाहावे लागेल.
बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतले, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला होता. याविरोधात दाद मागूनही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात अद्याप कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे आता बच्चू कडू यांनी सरकारची साथ सोडून वेगळ्या वाटेने जाण्याचा इशारा दिला होता. बच्चू कडू टोकाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. तर सोबतच १ तारखेला रवी राणा यांच्या बैठकीतील व्हिडिओ रिलीज करणार असल्याचे म्हणाले होते. नेमक काय असणार त्या व्हिडिओ मध्ये ते १ तारखेला समोर येणार आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading