Ticker

6/recent/ticker-posts

विवाहित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न! आईचा पाडला मुडदा



पोंभुर्णा: तालुक्यातील सोनापूर येथे 10 जुलै ला दुपारी 3 वाजताच्या सुमारास 20 वर्षीय युवकाने मोठ्या आईच्या सुनेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, आरोपी युवकाने 20 हजार रुपये दे अन्यथा तुझ्यावर बळजबरी संभोग करतो, पैसे दिले नाहीतर तुझ्या मुलाला मारून टाकणार अशी धमकी देत पीडित महिलेचा मोबाईल आरोपीने हिसकावून आपल्याजवळ ठेवला.पीडित विवाहित महिलेने सुटका करण्यासाठी 20 हजार रुपये देण्याचे कबूल करीत त्याच्यापासून सुटका केली.

मात्र पीडित महिलेने घडलेला सर्व प्रकार आपल्या सासू ला सांगितला, सदर प्रकार ऐकून पीडितेची 62 वर्षीय सासू चा राग अनावर झाला. ती थेट आरोपी युवकाकडे मोबाईल व जाब विचारण्यासाठी गेली.
मात्र बराच वेळ झाला ती महिला घरी परतली नाही, त्या महिलेचा मुलगा त्याठिकाणी गेला असता त्याची आई खतांच्या ढिगाऱ्यात रक्तबंबाळ मृत अवस्थेत दिसली, आईचा खून झाला हे समजताच पोलिसांना माहिती देण्यात आली.

महिलेच्या नाका-तोंडावर दगडाचे वार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत आरोपी युवकांवर कलम 354, 354ब, 302, 329, 201 व 506 अंतर्गत गुन्हे दाखल केले, आरोपी युवक तोपर्यंत गावातून जंगलाच्या दिशेने पळाला, याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी कसोशीने शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांनी भेट दिली. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरला.

Post a Comment

0 Comments