Ticker

6/recent/ticker-posts

नवेगाव चकठाणा परिसरात वाघाची दहशत, शेतकरी भयभीत



पोंभुर्णा: वनपरिक्षेत्रात वाघाने मागील काही दिवसांपासून दहशत पसरलेली असली तरी वनविभागाला या गोष्टीचे काहीही सोयरसुतक नसल्याचे निदर्शनास येत आहे.

मागील महिन्यात नांदगाव,जूनगाव, देवाडा,घोसरी, फुटाणा,दिघोरी, गोवर्धन इत्यादी गावात वाघाने जणू बसताना मांडले होते.वाघाच्या भीतीने शेतकरी शेतावर जाण्यास धजावत नव्हते. याची वनविभागास अनेकदा शेतकऱ्यांनी माहिती दिली मात्र वनविभागाच्या निदर्शनास वाघ येत नसावा ,म्हणून कुठलीच उपाय योजना वनविभाग करताना दिसत नाही.अशा शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत.

सोमवार दिनांक 9 जुलै रोजी नवेगाव मोरे या परिसरात वाघाचे दर्शन शेतकऱ्यांना झाले. चिमणा हेटी येथील शेतकऱ्याच्या बकरीला वाघाने ठार केले आहे. अनेक महिन्यापासून या परिसरात वाघ निदर्शनास येत आहे. एकाच परिसरात वाघ सतत दिसत असल्याने वाघाचे वास्तव्य परिसरातच असावे असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे.

मागील दिवसात नांदगाव येथे मृता अवस्थेत वाघीण आढळून आली होती. वाघीण वाघाला व पिल्लांना पिल्लांना दिसत नसल्यामुळे वाघ व वाघिणीचे पिल्ले आपल्या आईच्या शोधात याच परिसरात फिरत असावेत असाही शेतकऱ्यांचा अंदाज आहे. वाघिणीच्या मृत्यूला वनविभाग जबाबदार असल्याच्या तक्रारी असताना वनविभाग कुठलेही गांभीर्य घेत नसल्याचे जाणवत आहे. त्यामुळे मानवी जीव वाघाचा शिकार झाल्याशिवाय वन विभागाला जाग येणार की नाही? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

नवेगाव मोरे व परिसरात दहशत पसरवणाऱ्या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांसमवेत शिवसेनेने केली आहे.

Post a Comment

0 Comments