चंद्रपूर : वर्धा नदीच्या पात्रात मासे पकडायला गेलेली तीन मुले वाहून गेल्याची दुदैवी घटना गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगावात काल सायंकाळच्या सुमारास घडली.
पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.लगेच पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली. आज पहाटेला शोध मोहिमेला यश आले. वाहून गेलेल्यापैकी प्रतिक नेताजी जुनघरे या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह बघताच कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. निर्दोष ईश्वर रंगारी, सोनल सुरेश रायपुरे ही मुले अद्याप सापडलेली नाहीत. युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू आहे.
पोलिसांची शोध मोहीम सुरु आहे. या दुदैवी घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading