Ticker

6/recent/ticker-posts

शोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज"*



     - रामचंद्र सालेकर 
(वाघनख शाळेत संत तुकाराम महाराज जयंती संपन्न)
   जि.प.चंद्रपूर पं.स.वरोरा अंतर्गत जि.प.उ.प्राथ.शाळा वाघनख येथे २ फेब्रुवारी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची जयंतीचा कार्यक्रम मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. आपल्या अध्यक्षीय भाषणात सालेकर यांनी संत तुकाराम महाराज यांनी प्रस्थापित शोषकांना आपल्या अभंगरुपी शस्त्राने परास्त करुन त्यांचा कर्मकांड अंधश्रद्धा वर्णभेद जातीभेदाचा डोलारा किर्तनाच्या माध्यमातून ध्वस्त करुन शोषितांना जागवलं याचा बदला त्यांनी इंद्रायनीत अभंगगाथा बुडवून त्यांना संपविले.ज्या गोष्टींवर जगतगुरु तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून घनाघाती वार केले,प्रस्थापित शोषकांच्या विरोधात विद्रोह केला. परंतु दुर्दैव असे की तुकाराम महाराजांनी ज्या गोष्टीचा आयुष्यभर विरोध केला, त्याच काल्पनीक मिथ्या कथा रचून तुकाराम महाराजांचा खुन लपविण्यात आला व पुष्पक विमानाने वैकुंठाला गेल्याची भ्रामक आवई ठोकून या शोषकांनी स्वतःचे पाप लपविले. तुकोबाचा वारकरी म्हणजे अनिष्ठ रुढी परंपरा कर्मकांड अंधश्रद्धा...इत्यादींवर वार करणारा असा होता परंतु पंढरपूरला पायी वारी करणारा टाळ कुटणारा वारकरी म्हणून पुढे आणला गेला.
   संत तुकाराम महाराज हे शिवकालीन संत होवून गेले. अवघ्या बाराव्या वर्षी शिवरायांना 'छत्रपती' ही पदवी देणारे शिवाजी महाराजांचे खरे गुरु स्वराज्याचे मार्गदाता संत शिरोमणी जगतगुरू संत तुकाराम महाराज होते. शोषितांचे पालनहार तर शोषकांचे कर्दनकाळ म्हणजे संत तुकाराम महाराज. त्यांच्या अभंगाचे दाखले देत त्यांचे समाज जागृतीचे कार्य अनन्य साधारण असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगीतले. याप्रसंगी धनराज रेवतकर विज्ञान शिक्षक यांनीही संत तुकाराम महाराजांच्या जयंती दिनी उद्बोधक असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन जेष्ठ शिक्षिका सौ रेखा थुटे मॕडम यांनी केले.स.शि.संतोष धोटे, शिरीष मोहबे यांनी कार्यक्रमाच्या यशिस्वितेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचलन सातव्या वर्गाची विद्यार्थीनी कु.शारदा आत्राम हिने केले तर आभार कु.श्रावणी रामटेके या विद्यार्थीनीने मानले.

Post a Comment

0 Comments